मलकापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 1 तर नगरसेवक पदासाठी 11उमेदवारी अर्ज दाखल
मलकापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 1 तर नगरसेवक पदासाठी 11उमेदवारी अर्ज दाखल
कराड, दि. 14 - मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी सात उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाकडून एक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन तर अपक्ष एक असे आज उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी सूर्यकांत दिलीपकुमार खिलारे यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग 1 मधील सर्वसाधारण जागेसाठी नितीन उर्फ नारायण विष्णुपंत काशीद-पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रभाग 2 मधील सर्वसाधारण महिला जागेसाठी वंदना दत्तात्रय साळुंखे यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रभाग क्रमांक 4 मधील अनुसूचित जाती जागेसाठी सुनील प्रल्हाद खैरे यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रभाग 5 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव जागेसाठी मृणालिनी अमर इंगवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
याच प्रभागातील सर्वसाधारण जागेसाठी दादासो बाबू शिंगण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून व अमर नारायण इंगवले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रभाग 6 मधील सर्वसाधारण जागेसाठी सुरज शंकर शेवाळे यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रभाग 7 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव जागेसाठी पूजा गणेश चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रभाग 10 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी प्रमोद माणिकराव शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.याच प्रभागातील सर्वसाधारण महिला जागेसाठी सुनिता भगवान पाटील यांनी व प्रियांका योगेश शिंदे या दोन्ही उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले.
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कपिल जगताप,सहाय्यक ज्ञानदेव साळुंखे यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Comments
Post a Comment