सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्या तक्रारीवर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडून सुनावणी; पवार यांनी पुराव्यासह मांडले महत्त्वाचे मुद्दे
सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्या तक्रारीवर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडून सुनावणी; पवार यांनी पुराव्यासह मांडले महत्त्वाचे मुद्दे
कराड, दि. 20 - सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी तहसीलदार कचेरी समोर गेली 44 दिवस धरणे आंदोलन सुरू केले आहे. बोगस मतदार नोंदणी व कार्यालयीन अधिकारी या बाबत कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन सुरू असून याबाबत सातारा अप्पर जिल्हाधिकारी माने यांनी आज गणेश पवार यांची भेट घेत त्यांनी केलेल्या मागण्या व तक्रारी याबाबत उपविभागीय कार्यालयात आज सुनावणी झाली.
दरम्यान पवार यांनी केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही व चुकीच्या पद्धतीचा आदेश देण्यात आला तर या सर्व प्रक्रिये विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करणार असलेचे गणेश पवार यांनी सांगितले.
या सुनावणीत झालेल्या चर्चेनुसार व गणेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सातारा व उपविभागीय अधिकारी कराड यांना रीतसर तीन मुद्द्याबाबत वेगवेगळ्या तीन तक्रारी अर्ज करून कारवाई करण्याबाबतची मागणी केली होती. परंतु त्यांच्याकडून कोणतेही कारवाई झाली नाही म्हणून गणेश पवार गेली 44 दिवसापासून कराड उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान आज 44 व्या दिवशी सातारा अप्पर जिल्हाधिकारी माने साहेब यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांनी मांडलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने सविस्तर पुरावे पाहून चर्चा केली. त्यावेळेस पवार यांनी त्यांच्यासमोर पुरावे सादर करून आपले म्हणणे मांडले. यामध्ये तीन मुद्द्यांचा समावेश होता त्याबद्दल गणेश पवार यांनी तीन मुद्दे मांडत दिलेल्या माहितीनुसार...
मुद्दा नंबर एक
संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी करणेबाबत...
संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांची संजय गांधी शाखेमध्ये जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयाकडून बदली करण्यात आलेली आहे तसेच युवराज पाटील यांना संजय गांधी शाखेचे काम करत करत निवडणूक शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे अधिकार तहसीलदार कराड यांना आहेत परंतु युवराज पाटील यांची संजय गांधी शाखेतून निवडणूक शाखेमध्ये पूर्णवेळ काम करण्यासाठी त्यांची सेवा वर्ग करायची असल्यास तहसीलदार कराड यांनी जिल्हाधिकारी सातारा यांची परवानगी घेणे आवश्यक आहे जर त्यांनी युवराज पाटील यांना निवडणूक शाखेमध्ये पूर्ण वेळ काम करण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडून परवानगी घेतली असल्यास त्याआदेशाची कागदपत्रे आहेत की नाहीत हे चौकशी वेळी पाहणी करावी.
तसेच 14 मार्च 2024 चे 22 जून 2025 पर्यंत युवराज पाटील यांनी संजय गांधी शाखेमध्ये काम न करता निवडणूक शाखेमध्ये काम करण्यासंदर्भात कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांना आदेश दिले असल्यास त्या आदेशाची प्रत असल्यास चौकशी वेळी त्याची पाहणी करावी.
तसेच युवराज पाटील हे फिल्ड ऑफिसर/ मंडल अधिकारी असल्यामुळे त्यांनी कार्यालयातील कामाचा अनुभव घेण्यासाठी दोन वर्ष कार्यालयामध्ये काम करण्याबाबतचा शासनाचे परिपत्रक असतानाही युवराज पाटील हे गेली सात वर्षापासून तहसील कार्यालयामध्ये काम करत आहेत असे काम करता येते अथवा नाही त्याबाबतचे शासनाचे परिपत्रक अथवा जीआर ची पाहणी करावी.
त्याचबरोबर युवराज पाटील यांनी संजय गांधी शाखेमध्ये त्यांची बदली झाल्यापासून एक ही दिवस त्या शाखेमध्ये काम केलेले नसता नाही त्यांनी त्या शाखेत काम केल्याबाबतचा पगार घेतलेला आहे. प्रशासनाने ज्या विभागात बदली केलेली आहे त्या विभागांमध्ये काम न करता पगार घेता येत असल्यास तसे शासनाचे परिपत्रक अथवा जीआर असल्यास त्याची पाहणी करावी.
तरी माझ्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने आजच्या झालेल्या सुनावणीमध्ये हे मुद्दे मांडलेले आहेत तसेच माझ्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करता वेळेस व चौकशी झाल्यानंतर निर्णय देता वेळेस मला या सर्व मुद्द्याच्या अनुषंगाने परिपत्रक अथवा जीआर मिळावेत. अशी विनंती केली आहे तसेच आजच्या सुनावणीवेळी मी माझे म्हणणे व सर्व पुरावे अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांना नव्याने दिलेले आहेत.
तसेच माझ्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई व्हावी तोपर्यंत माझे धरणे आंदोलन चालू राहील तसेच आचारसंहिता संपेपर्यंत माझ्या तक्रारी अर्जावरती योग्य ती कारवाई झाली नाही तर मी आमरण उपोषणास बसणार असल्याचे सांगितले
मुद्दा नंबर दोन
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कराड यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामाची चौकशी करून कारवाई होण्याबाबत.
प्रियंका श्रीकांत चव्हाण, स्वाती सुनील मोरे, किशोर जयवंत जाधव, रूथ मायकल काळे, शितल सुरेश सावंत, सुरेश बबन मदने, मधुकर डिसले, स्वाती हणमंत पाटील, सुनिता सुरेश जाधव या व्यक्ती कापील गावच्या रहिवासी नसतानाही या लोकांची प्रथमच कापिल गावच्या मतदार यादी मध्ये नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. परंतु या लोकांची नव्याने नावे समाविष्ट करताना मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कराड यांनी यांच्या पूर्वीच्या गावातील मतदार यादी मधील नावे कमी केलेली आहेत अथवा नाहीत हे पाहिलेले नसतानाही या लोकांची नावे कापील गावामध्ये नव्याने वाढवलेली आहेत.
पूर्वीच्या त्यांच्या गावांमधील मतदार यादी मधील या लोकांची नावे आहेत तसेच या लोकांची नावे त्यांच्या गावच्या मतदार यादीतून कमी झालेली नसतानाही मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी कोणत्या कायद्याखाली या लोकांची नावे पूर्वीच्या मतदार यादीतून कमी न करता कापिल गावांमध्ये वाढवण्यात आली. पूर्वीच्या मतदारसंघातील नावे कमी न करता नवीन ठिकाणी वाढवता येत असेल तर याबाबत शासनाचे परिपत्रक अथवा जीआरची चौकशी वेळी पाहणी करावी.
या लोकांनी ऑनलाइन 6 नंबरचे फॉर्म भरलेले आहेत या भरलेल्या 6 नंबरच्या फॉर्म वरून या लोकांची कापिल गावांमध्ये नव्याने मतदान नोंदणी करताना मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी फॉर्म नंबर 8 स्थलांतराचा फॉर्म भरलेला आहे की नाही हे पाहणे आवश्यक होते. तसेच फॉर्म नंबर 7 या लोकांची त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणच्या मतदार यादीतून नाव कमी केले आहे की नाही हे पहाणे आवश्यक असतानाही त्यांनी 7 व 8 नंबर न पाहता 6 नंबर पाहून या लोकांची कापील गावच्या मतदार यादीमध्ये नव्याने नावे समाविष्ट केलेली आहेत. साधारण 25 ते 60 वयातील लोकांची नव्याने मतदार नोंदणी होत असताना 6 नंबरचा फॉर्म ऑनलाईन आल्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी यांनी या लोकांचे फॉर्म नंबर 7 व फॉर्म नंबर 8 न पाहता फक्त 6 नंबर पाहूनच मतदार नोंदणी करता येत असल्याबाबतचे शासनाचे परिपत्रक अथवा जीआर असल्यास चौकशी वेळी त्याची पाहणी करावी.
माझ्या पुराव्यामध्ये या लोकांची पूर्वीच्या त्यांच्या गावातील मतदार याद्या तसेच कापिल गावामध्ये त्या लोकांची मतदार यादी मध्ये असलेल्या नावांची यादी अशा दोन्ही याद्या अप्पर जिल्हाधिकारी सो सातारा यांच्यासमोर सादर केलेल्या आहेत तसेच या लोकांची त्या गावातील रेशन कार्डही त्याबरोबर सादर केलेली आहेत. चौकशी वेळी याची पाहणी करावी.
वरील तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई व्हावी तोपर्यंत माझे धरणे आंदोलन चालू राहील तसेच आचारसंहिता संपेपर्यंत माझ्या तक्रारी अर्जावरती योग्य ती कारवाई झाली नाही तर मी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
मुद्दा नंबर तीन
फौजदारी गुन्हे दाखल होण्याबाबत
प्रियंका श्रीकांत चव्हाण, स्वाती सुनील मोरे, किशोर जयवंत जाधव, रूथ मायकल काळे, शितल सुरेश सावंत, सुरेश बबन मदने, मधुकर डिसले, स्वाती हणमंत पाटील, सुनिता सुरेश जाधव या व्यक्ती कापील गावच्या रहिवासी नाहीत. तसेच या व्यक्तींच्या नावावरती कपिल गावामध्ये घर, जमीन, रेशन कार्ड नसतानाही या लोकांनी कापिल गावच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून कापील गावामध्ये मतदार नोंदणी करून मतदान केलेले आहे तरी या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल व्हावे.
तसेच ही लोक कापिल गावामध्ये राहिला नसल्याबाबतचा तसेच या लोकांच्या नावावरती घर मिळकत व शेत मिळकत नसल्याबाबतचा मंडल अधिकारी मलकापूर, तलाठी कापील, ग्रामसेवक कापील, या लोकांनी समक्ष पाहणी करून तसा अहवाल तहसीलदार कराड यांना सादर केलेला आहे तो ही चौकशी वेळी पाहण्यात यावा.
तसेच या लोकांना वाचवण्यासाठी कापिल गावातील काही लोकांनी बनावट नोटराईज भाडेकरार अस्तित्वात आणलेले आहेत तसेच हे भाडेकरार करण्यासाठी घरमालकांनी पुण्यावरून स्टॅम्प पेपर आणलेले आहे. तसेच या भाडे कराराच्या नोटऱ्या 2024 ला केलेल्या आहेत असे दाखवण्यात आले परंतु 2024 च्या भाडे कराराच्या नोटरीला 2025 चे लाईट बिल जोडलेले आहे.( उदाहरण देण्यासाठी आजच्या 20 -11-2025 ची भाडेकरार नोटरी करीत असताना या नोटरी ला 2026 चे लाईट बिल जोडलेले आहे.) तरी चौकशी वेळी या नोटरीची पाहणी करण्यात यावी.
या लोकांनी कापिल गावच्या लोकांच्याकडून बनावट भाडे करार अस्तित्वात आणलेले असले तरी त्या नोटराईज भाडे करारावरती आधार कार्डचा रहिवासीचा पत्ता बदलता येत नाही. तरी या लोकांनी कापील गावचे पत्त्याचे आधार कार्ड बनवताना कोणती कागदपत्रे जोडली आहेत याची चौकशी केले आहे की नाही हे. आदेश करते वेळेस या मुद्द्याची चौकशी बाबतची कागदपत्रे त्या चौकशी मध्ये आहेत की नाहीत हे पहावे.
तसेच बनावट भाडेकरार अस्तित्वात आणून मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासमोर ते सादर केलेले आहेत त्यामुळे नोटरी करणारे तसेच घरमालक भाडेकरार करणारे व सर्व साक्षीदार यांच्या वरती ही फौजदारी गुन्हे दाखल व्हावे तरी याबाबत चौकशी वेळी या सर्व कागदपत्राची पाहणी करावी.
या लोकांची कापिल गावच्या पत्त्याचे आधार कार्ड तसेच त्यांच्या पूर्वीच्या गावच्या पत्त्याचे आधार कार्ड हे दोन्ही आधार कार्ड अप्पर जिल्हाधिकारी सो सातारा यांच्यासमोर सुनावणीवेळी सादर केलेले आहेत चौकशी वेळी त्याची पाहणी करावी.
तरी माझ्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई व्हावी तोपर्यंत माझे धरणे आंदोलन चालू राहील तसेच आचारसंहिता संपेपर्यंत माझ्या तक्रारी अर्जावरती योग्य ती कारवाई झाली नाही तर मी आमरण उपोषणाला बसणार आहे असे त्यांना सांगितले आहे.
आजच्या सुनावणीतील ठळक घडामोडी
मतदारा नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी माने साहेब यांना मी अजून पुरवणी अहवाल सादर करणार आहे त्यासाठी तहसीलदार कराड यांच्याकडून कागदपत्रे मागणी केलेली आहे तरी ती कागदपत्रे आल्यानंतर मी पुरवणी अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.
कापिल गावामध्ये साधारण 40 बोगस मतदार नोंदणी झाली आहे तसेच गोळेश्वर गावामध्ये 75 बोगस मतदान नोंदणी झाली आहे याबाबत सर्व पुरावे अप्पर जिल्हाधिकारी सो सातारा यांना दाखवण्यात आलेल आहेत. त्याचबरोबर सोलापूर ठिकाणचे आधार कार्ड वरती पत्ता असून देखील कापील गावामध्ये फक्त त्या आधार कार्ड वरती मतदान नोंदणी केलेली आहे.
तसेच कपिल गावामध्ये व गोळेश्वर गावामध्ये तीन लोकांची मतदान नोंदणी करण्यात आली आहे परंतु मुळात ही तीन ही लोक कापिल अथवा गोळेश्वर गावामध्ये राहण्यासाठी नाहीत हे ही अप्पर जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडण्यात आले व पुरावे दाखवण्यात आल्याचे गणेश पवार यांनी सांगितले.
तसेच आजच्या सुनावणीमध्ये पवार यांनी अप्पर जिल्हाधिकारी माने साहेब यांना असे सांगितले आहे की, माझ्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही व चुकीच्या पद्धतीचा आदेश देण्यात आला तर मी या सर्व प्रक्रिये विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहे.

Comments
Post a Comment