कराड नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 11 तर नगरसेवक पदासाठी 98 अर्ज दाखल.


कराड नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 11 तर नगरसेवक पदासाठी 98 अर्ज दाखल.

कराड, दि. 16 - कराड नगर परिषद निवडणुकीसाठी आज रविवारी नगराध्यक्ष पदासाठी 11 तर नगरसेवक पदासाठी 98 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी 14 उमेदवारी अर्ज तर नगरसेवक पदासाठी 172 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत व्हटकर यांनी दिली.

आज रविवारी सातव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ११ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये विनायक पावसकर भाजप, रणजीत पाटील शिवसेना व दोन अपक्ष, सुहास जगताप भाजप, अल्ताफ शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष, राजेंद्रसिंह यादव शिवसेना व यशवंत विकास आघाडी, अतुल शिंदे भाजप तर बापू लांडगे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले.

नगरसेवक पदासाठी

प्रभाग १ अ मधून पोर्णिमा सूर्यवंशी अपक्ष, सुरेखा काटकर भाजप, रूपाली माने लोकशाही आघाडी कराड शहर, धनश्री माने लोकशाही आघाडी कराड शहर,  प्रभाग १ ब मधून सोहेब सुतार लोकशाही आघाडी कराड शहर, संजय कांबळे भाजप, हुमिरा शेख राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष.  

प्रभाग २ अ  मधून सोनल नाकोड भाजप, रजनी शिंदे भाजप, समृद्धी करमरकर भाजप,   प्रभाग २ ब  मधून प्रशांत कुलकर्णी भाजप, समीर करमरकर भाजप, 

प्रभाग ३ अ मधून रजिया दाऊद आंबेकरी लोकशाही विकास आघाडी व अपक्ष. प्रभाग ३ ब मधून प्रवीण पवार लोकशाही विकास आघाडी व अपक्ष, दाऊद सय्यद अपक्ष, रूपेंद्र कदम भाजप. 

प्रभाग ४ अ मधून शैला पाटील शिवसेना व दोन अपक्ष अर्ज, प्रियंका यादव शिवसेना व यशवंत विकास आघाडी, प्रभाग ४ ब मधून अर्चना ढेकळे यशवंत विकास आघाडी व शिवसेना, नितीन ढेकळे. 

प्रभाग ५ अ मधून अर्चना पाटील काँग्रेस व अपक्ष, स्नेहल कदम शिवसेना व अपक्ष, प्रभाग ५ ब मधून राहुल भोसले लोकशाही आघाडी कराड शहर, शुभम नादे भाजप, गजेंद्र कांबळे शिवसेना व यशवंत विकास आघाडी. 

प्रभाग ६ अ मधून सानिया मुतवल्ली अपक्ष, शितल बर्गे शिवसेना उबाठा, परवीन शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष, सपना ओसवाल राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष, प्रभाग ६ ब मधून अल्ताफ शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष, शाहरुख शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष, सुनील व्हावळ भाजप, साबीरमिया मुल्ला अपक्ष,

प्रभाग ७ ब मधून विद्या मोरे अपक्ष.

प्रभाग ८ अ मधून किशोरी शिंदे भाजप, देवयानी डुबल अपक्ष, सुप्रिया डुबल अपक्ष. प्रभाग ८ ब मधून विजय वाटेगावकर अपक्ष.

प्रभाग ९ अ मिनाज पटवेकर लोकशाही आघाडी कराड शहर व अपक्ष, ९ अ मध्ये सानिया पटवेकर अपक्ष 

प्रभाग १० अ आशा मुळे यशवंत विकास आघाडी व  शिवसेना, प्रभाग १० ब मधून मोहसीन कागदी अपक्ष, शिवसेना व यशवंत विकास आघाडी मधून. 

प्रभाग ११ अ मधून सुदर्शना थोरवडे राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष, माया भोसले शिवसेना व यशवंत विकास आघाडी,  सुवर्णा भोसले शिवसेना व यशवंत विकास आघाडी. प्रभाग ११ ब मधून पूनम धोत्रे, विनायक वेल्हाळ यांचे भाजप व अपक्ष, योगेश वेल्हाळ.

प्रभाग १२ अ मधून अनिता पवार यशवंत विकास आघाडी व शिवसेना, प्रवीण शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष, रुकय्या मुलाणी राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष, तेजस्विनी कुंभार शिवसेना व अपक्ष असे दोन अर्ज दाखल. प्रभाग १२ ब मधून किसन उर्फ जयवंत चौगुले भाजप, अक्षय पवार यशवंत विकास आघाडी व शिवसेना, अल्ताफ शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष, वीरेंद्र गुजर भाजप, शाहरुख शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष, विजय यादव शिवसेना व यशवंत विकास आघाडी.

प्रभाग १३ अ मधून किर्तीका गाडवे शिवसेना व अपक्ष,  प्रभाग १३ ब  मधून विजय यादव यशवंत विकास आघाडी व शिवसेना, राकेश शहा लोकशाही आघाडी कराड शहर, अनिस मुलाणी राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष

प्रभाग १४ अ  प्रियांका भोंगाळे लोकशाही आघाडी कराड शहर.  १४ ब मधून सचिन पवार अपक्ष,

प्रभाग १५ अ मधून गीता पाटसुपे अपक्ष, प्रभाग १५ ब  मधून मियाज आंबेकरी राष्ट्रीय काँग्रेस तर प्रभाग १५ क  मधून राजश्री कारंडे भाजप यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

उद्या सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक