मलकापुरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व समविचारी पुरोगामी विकास आघाडीची उद्या प्रचार सभा
मलकापुरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व समविचारी पुरोगामी विकास आघाडीची उद्या प्रचार सभा
कराड, दि. 28 - मलकापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व समविचारी पुरोगामी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार, दि. 28 रोजी सायंकाळी 6 वाजता मलकापूर येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेस राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. नामदार मकरंद पाटील (आबा), सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कार्याध्यक्ष संजय देसाई हे प्रमुख उपस्थित म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील उंडाळकर, राजेश पाटील वाठारकर, सुनील पाटील, अॅड. आनंदराव पाटील, इंद्रजीत चव्हाण,अजित पाटील चिखलीकर,प्रा. धनाजीराव काटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आर्यन सविनय कांबळे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व अपक्ष या आघाडीचे १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला मलकापूर शहरातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पुरोगामी विकास आघाडीच्यावतीने करण्यात येत आहे.
---

Comments
Post a Comment