कराड नगरपरिषद निवडणूक काँग्रेस चिन्हावर लढणार; पृथ्वीराज चव्हाण

 


कराड नगरपरिषद निवडणूक काँग्रेस चिन्हावर लढणार; मा आ. पृथ्वीराज चव्हाण 

मलकापूर नगरपरिषद निवडणूक समविचारी उमेदवारांना मदत करणार

कराड, दि. 19 - कराड व मलकापूर नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत असताना काही जागाबाबत तडजोड करून ही निवडणूक लढवण्यासाठी माजी मंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न झाले. मी स्वतः या कोणत्याही प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे सर्व बैठका व चर्चेअंती कराड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

कराड नगरपरिषद निवडणुकीबाबत चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीतील काही पक्षांच्या म्हणण्यानुसार आघाडी करूनच लढावे असा सूर आल्याने व ते शक्य नसल्याने काँग्रेसने कराड नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे अनेक उमेदवार काँग्रेस पक्षाकडून दिले असून ते पक्षाच्या चिन्हावर तर मलकापुरात नगरपरिषदेच्या निवडणुकीत समविचारी उमेदवारांना मदत करून निवडणूक लढवणार असल्याचे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले काँग्रेसने अंतिम निर्णय घेतल्याने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाईल व नगराध्यक्षही आमचा नक्कीच विजय होईल.

काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांसह शिवसेना ठाकरे गटाने ही एक उमेदवार दिला असून त्यांचाही प्रचार करण्यात येईल असे सांगून चव्हाण म्हणाले मी स्वतः प्रत्यक्ष गल्ली बोळात प्रचारात नसलो तरी उमेदवारांनी विनंती केल्यास त्यांच्यासाठी जरूर काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक तसेच मी सभा घेत प्रचार करेन. मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांना मदत देत त्यांच्या प्रचारात काँग्रेस नक्कीच सहभाग घेईल असे चव्हाण यांनी सांगितले.

कराड दक्षिण काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नुकतेच मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपात गेलेल्या मनोहर शिंदे यांच्या बाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मनोहर शिंदे यांनी याबाबत आपल्या सोबत चर्चा केली असती तर मी त्यांना नक्कीच आशीर्वाद दिला असता, ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे मला समजले मात्र त्यांनी माझ्याशी व्यक्तिगत बोलणे गरजेचे होते. तरीही त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे त्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असेही चव्हाण यांनी सांगितले.

कराड मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत स्टार प्रचारक सहभागी होणार;अमित जाधव 

कराड नगर परिषदेची निवडणुक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार स्वबळावर व काँग्रेसचे चिन्हावर नगराध्यक्ष पदाची व नगरसेवक पदाचे उमेदवार निवडणूक लढवणार असून यासाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारक येणार असल्याची माहिती कराड शहर काँग्रेस अध्यक्ष एड. अमित जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

कराड नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने भरण्यात आलेला नगराध्यक्ष पदाचा व नगरसेवक पदाचे अर्ज वैध ठरले असल्याने त्या सर्व ठिकाणी आम्ही स्थानिक विकासाच्या अनुषंगाने प्रचार करून निवडणूक लढवणार असल्याचे सांगून जाधव म्हणाले या निवडणुकीच्या प्रचाराकरिता कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम, चंद्रकांत हंडोरी हे येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक