कराडची वाट लावणाऱ्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना वाट दाखवा; ना. एकनाथ शिंदे

 


कराडची वाट लावणाऱ्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना वाट दाखवा; ना. एकनाथ शिंदे

भर सभेत राजेंद्रसिंह यादव यांनी सुचवलेल्या विविध विकास कामांना निधी जाहीर

कराड, दि. 28 (प्रतिनिधी)  कराड शहराच्या विकासाचा झेंडा हाच यशवंत व लोकशाही आघाडीचा अजेंडा असून या आघाडीने समोरच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून कराडची वाट लावणाऱ्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना वाट दाखवा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

कराड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने यशवंत व लोकशाही आघाडीच्या संयुक्त प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकशाही आघाडीच्या अध्यक्ष जयंत पाटील तसेच यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव त्याचप्रमाणे माजी मंत्री बाळासाहेब पाटील व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

'विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय नारळ', असे सांगत कराडची वाट लावणाऱ्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना वाट दाखवा, असे आवाहन करत कराडच्या विकासासाठी जेवढा लागेल तेवढा निधी देऊ, अशी ग्वाही ही या प्रचार सभेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याच वेळी राजेंद्रसिंह यादव यांनी सुचवलेल्या अन्या कामांसाठी निधी दिला जाणार असल्याची घोषणाही यावेळी शिंदे यांनी केली.

ना. शिंदे पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी येथूनच महाराष्ट्राच्या विकासाची गुढी उभारली असून त्यांच्या प्रेरणेनेच व आशीर्वादाने त्यांच्या विकासाचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. यासाठीच शिवसेना प्रणित यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीची ही एकजूट या निवडणुकीत निश्चितच यश मिळेल अशी अशा व्यक्त केली.

महाराष्ट्रात  लोकहिताच्या अनेक योजना राबवल्या असून कोणी कितीही सांगितले तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याचे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. राज्यात अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या. त्यामुळेच लोकांनी राज्यात बहुमताने सरकार निवडून दिले. याचे श्रेय केवळ माझ्या लाडक्या बहीण आणि भावांचे आहे. आता कराडचे विकासाची गाडी सुसाट गेली पाहिजे, यासाठी विकासाच्या गाडीला प्रगतीचे डबे जोडा. राजेंद्रसिंह यादव जनतेतील माणूस आहे. कराडच्या विकासासाठी त्यांना आतापर्यंत 325 कोटींचा निधी दिला आहे. याशिवाय आत्ताच त्यांनी सुचवलेल्या अजूनही काही कामासाठी निधी देणार आहे. 

जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठी खर्च झाला पाहिजे ही सरकारची भूमिका असून नगर विकास खात्याच्या माध्यमातून आणखी निधी देणार असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, पाणीपुरवठा, योजना, ड्रेनेज लाईन, आरोग्य, सुविधा, शिक्षण, यशवंतराव चव्हाण  समाधीस्थळावर ऑडिटेरियम, बस स्थानक परिसरात शॉपिंग सेंटर व पार्किंग व्यवस्था या सुविधांसह कराड विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लावू. यासाठी कराडमध्ये परिवर्तन घडणे गरजेचे आहे. राजेंद्रसिंह यादव यांना नगराध्यक्ष होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. विधानसभेची जादू कराड नगरपालिकेत हे राहील आणि विकासाचा झेंडा कराड नगरपालिकेवर फडकेल, असा विश्वास ही शिंदे यांनी शेवटी व्यक्त केला. 

बाळासाहेब पाटील म्हणाले, राजेंद्रसिंह यादव यांनी एकनाथ शिंदे साहेबांचे माध्यमातून कराड शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणण्याचा प्रयत्न केला. शरद पवार साहेबांच्या माध्यमातून सहकार मंत्री असताना शहरातील अनेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आघाडीची चिन्हे उशिरा मिळाली, मात्र जिद्दी कार्यकर्त्यांनी ती घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. जाहीरनाम्यात आम्ही प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेणार आहोत. सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही सोबत घेतले आहे. पी. डी. पाटील साहेबांनी वाढीव भागातही पिण्याचे पाण्यासह ड्रेनेजची व्यवस्था केली. आता वाढत्या लोकसंख्येनुसार या योजनांची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. यासाठी नारळ आणि छत्री या चिन्हांसमोरील बटन दाबून दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांना सेवा करण्याची संधी  द्यावी असे आवाहन केले.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले, पी. डी. पाटील साहेबांनी कराड शहराची विकासातून ओळख निर्माण केली. अनेक विकासात्मक योजना राबविल्या. त्याच विकासाला नवी उंची देण्यासाठी, गती देण्यासाठी भविष्यातील ५० वर्षांच्या दृष्टीने शहराच्या विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व शहराला हवे आहे. पालकत्व सांभाळणारी नगरपालिकेसारखी संस्था चुकीच्या माणसांच्या हातात गेली, तर हे गाव पाच पन्नास वर्षे मागे नेऊन ठेवालं. 

आम्ही शहरात चोवीस बाय सात नवी पाणीपुरवठा योजना आणणार, सोलर बचत योजना राबवणार, वाढीव भागातील ड्रेनेज योजना, नवीन चौदा अभ्यासिकेची निर्मिती, नवीन फिश मार्केट, पार्किंग समस्या, नवीन कृष्णा घाटांची निर्मिती, संत सखू मंदिराला क वर्ग पर्यटन दर्जा, पालिकेच्या सर्व शाळा अत्याधुनिक झाल्या पाहिजेत. यशवंत व लोकशाहीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून संधी द्या, पाच वर्षांत कराड शहरात कोणतेही विकासकाम शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पृथ्वीराज चव्हाण समर्थकांचा शिवसेना गटात प्रवेश

या प्रचार सभेच्या निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस मधील वडगावचे बंडा नाना जगताप, काले येथील पैलवान नाना पाटील यांच्यासह काँग्रेसच्या व अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या सर्वांचे स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक