कराड नगराध्यक्ष पदाचे 5 तर नगरसेवक पदाचे 72 अर्ज बाद
कराड नगराध्यक्ष पदाचे 5 तर नगरसेवक पदाचे 72 अर्ज बाद
कराड, दि. 18 - कराड नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 22 उमेदवारी अर्ज पैकी 17 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर नगरसेवक पदासाठी 330 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी 72 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी एकूण 17 नामनिर्देशनपत्र वैध ठरली : यामध्ये विनायक पावस्कर दोन (भाजप), झाकीर पठाण (काँग्रेस/अपक्ष), राजेंद्रसिंह यादव (यशवंत विकास आघाडी/शिवसेना) अल्ताफ शिकलगार (अपक्ष) रणजीत पाटील तीन (अपक्ष), इमरान मुल्ला (बसप), गणेश कापसे (अपक्ष), श्रीकांत घोडके (अपक्ष) शरद देव (अपक्ष), बापू लांडगे (अपक्ष), अतुल शिंदे (भाजप) व किरण थोरवडे (बसप). तर अवैध ठरलेली पाच अर्जामध्ये अल्ताफ शिकलगार, सुहास जगताप, रणजीत पाटील (शिवसेना), राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर यांचा समावेश आहे.
कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या अनुषंगाने दि.१० ते दि.१७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांकरीता दाखल केलेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी आज मंगळवार रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र येथे संपन्न झाली. सर्वप्रथम नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी जाहीर केली. यावेळी निवडणूक निरीक्षक (ऑब्जर्वर) श्रीमती ज्योती कावरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत व्हटकर उपस्थित होते.
यामध्ये अवैध ठरलेली उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे :
प्रभाग १ अ विमल माने. प्रभाग १ ब वीरेंद्र सिंहासने, सुदर्शन पाटसकर. प्रभाग २ अ नीलम कदम (भाजप), रजनी शिंदे (भाजप), समृद्धी करमरकर (भाजप).
प्रभाग २ ब सोनल नाकोड (भाजप), विनायक कदम भाजप, प्रशांत कुलकर्णी (भाजप). प्रभाग ३ अ रजनी पवार (शिवसेना).
प्रभाग ३ ब रुपेंद्र कदम (भाजप).
प्रभाग ४ अ शैला पाटील (शिवसेना). प्रभाग ४ ब महेश कांबळे (लोकशाही आघाडी कराड शहर).
प्रभाग ५ अ मिनाज सुतार (नॅशनल काँग्रेस पार्टी), प्रभाग ५ ब राजेंद्र कांबळे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार), अशोक सूर्यवंशी (शिवसेना), सागर लादे (भाजप).
प्रभाग ६ अ परवीन शिकलगार (भारतीय नॅशनल काँग्रेस), सपना ओसवाल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस),
प्रभाग ६ ब शाहरुख शिकलगार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), आलेजा मुतवल्ली (भारतीय नॅशनल काँग्रेस).
प्रभाग 7 अ प्रिया आलेकरी (यशवंत विकास आघाडी), गायत्री कुंभार (भाजप).
प्रभाग 7 ब घनश्याम पेंढारकर (भाजप), दीपक पाटील.
प्रभाग 8 अ तेजस्विनी डुबल, सुनिता साळुंखे, शालिनी शहा.
प्रभाग 8 ब संजय चन्ने (भाजप), शैलेंद्र गोंदकर (भाजप), अतुल बारटक्के (भाजप).
प्रभाग 9 अ साजिद मुल्ला (शिवसेना).
प्रभाग 9 ब हणमंत पवार (शिवसेना), विक्रम जाधव (इंडियन नॅशनल काँग्रेस).
प्रभाग 10 ब विक्रम भोपते (भाजप), विनोद चव्हाण (भाजप), प्रताप इंगवले (शिवसेना), ऋतुराज मोरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस).
प्रभाग 11 अ सुवर्णा भोसले (शिवसेना), सुनीता तपासे (भाजप).
प्रभाग 11 ब प्रसाद रैनाक (भाजप), विनायक वेल्हाळ (भाजप / शिवसेना), योगेश वेल्हाळ (यशवंत विकास आघाडी).
प्रभाग 12 अ प्रवीण शिकलगार (इंडियन नॅशनल काँग्रेस), तेजस्विनी कुंभार (शिवसेना), पूजा केंगार (भाजप/शिवसेना), माधुरी पवार (अपक्ष), छाया घोडके, सरिता हरदास (भाजप).
प्रभाग 12 ब किसन चौगुले, अल्ताफ शिकलगार (इंडियन नॅशनल काँग्रेस), विजय यादव (शिवसेना), राकेश पवार (यशवंत विकास आघाडी).
प्रभाग 13 अ तनुजा मुलाणी (इंडियन नॅशनल काँग्रेस).
प्रभाग 13 ब निखिल शहा (भाजप), शिवराज कोळी (भाजप), अनिस मुलाणी (इंडियन नॅशनल काँग्रेस), किरण पाटील (शिवसेना), पोपट शिंदे (शिवसेना).
प्रभाग 14 ब सचिन पवार (भाजप), इंद्रजीत भोपते (शिवसेना/ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी).
प्रभाग 15 अ गीता पाटसुपे (राष्ट्रीय काँग्रेस पार्टी), प्राजक्ता घेवदे (भाजप).
प्रभाग 15 ब अमीर हुसेन मुल्ला (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस).

Comments
Post a Comment