कराडला क्रीडानगरी म्हणून घडविण्याचा माझा संकल्प;आ.डॉ. अतुलबाबा भोसले.

कराड : भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले.

कराडला क्रीडानगरी म्हणून घडविण्याचा माझा संकल्प;आ.डॉ. अतुलबाबा भोसले.

कराड, दि. 26 - कराडला क्रीडानगरी म्हणून घडविण्याचा माझा संकल्प असून, त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याचा माझा निर्धार आहे. पुढील पाच वर्षांत कराडचे क्रीडा सुविधा क्षेत्र महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा ठाम विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला. कराड नगरपालिका निवडणुकीतील भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर, तसेच प्रभाग एक मधील उमेदवार सुरेखा काटकर व संजय कांबळे यांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठेत आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना आ.डॉ. भोसले पुढे म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपा महायुतीचे सरकार असल्याने कराड शहराचा कायापालट करण्याची मोठी संधी आपल्यासमोर आहे. कराड शहराच्या विकासासाठी आतापर्यंत २४४ कोटींचा निधी प्राप्त करून दिला असून, त्यातून स्मशानभूमी विकास, ओपन स्पेस विकास, अंतर्गत रस्त्यांची कामे, संरक्षक भिंतींची उभारणी अशा पायाभूत विकासाच्या दृष्टीने सर्व महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. ऑलम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांनी कराडच्या भूमीला जागतिक नावलौकिक दिला. त्याच प्रेरणेने कराडला ‘क्रीडा नगरी’ म्हणून मानाचा मुकूट मिळवून द्यायचा आहे. भाजपाचे सर्व उमेदवार लोकांत मिसळणारे, त्यांच्या समस्या जाणणारे आणि अनुभवसंपन्न आहेत. नागरी प्रश्नांची उत्तम जाण असलेले हे उमेदवार कराडच्या विकासाला वेग देतील. त्यामुळे भाजपाच्या नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागातील उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे.

यावेळी विनायक पावसकर व संजय कांबळे यांनी कराडच्या संपूर्ण विकासासाठी भाजपाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजय मिळवून देण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र माने, संग्राम घोलप, इंद्रजीत घोलप, गणेश काटकर, विश्वजीत दसवंत, बजरंग दसवंत, महेश जाधव, विलास काटकर, रविराज शिंदे, पंकज पावसकर, किरण इनामदार, संदीप जोशी, जगन्नाथ जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक