कराड शहरात रविवारी भारतीय जनता पार्टीची भव्य जाहीर सभा

कराड शहरात रविवारी भारतीय जनता पार्टीची भव्य जाहीर सभा

कराड, दि. 29 - कराड आणि मलकापूर नगरपालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ कराड शहरातील दत्त चौकात रविवारी (ता. ३०) दुपारी २ वाजता भारतीय जनता पार्टीची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची प्रचारतोफ धडाडणार आहे.

कराड नगरपालिका आणि मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशावेळी भाजपाने थेट कराडमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा घेत निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे. राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रभावी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या ना. फडणवीसांचे कराडमध्ये आगमन होणार असल्याने, नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कराड–मलकापूर क्षेत्रासाठी प्रस्तावित विकास आराखडे आणि आगामी योजनांबाबत मुख्यमंत्री काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सभेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, खनिज कर्म महामंडळाचे संचालक भरत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, भाजपाचे राज्य परिषद सदस्य सत्यजितसिंह पाटणकर, प्रदेश संचालन समितीचे सदस्य रामकृष्ण वेताळ, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, कराडच्या माजी नगराध्यक्ष शारदा जाधव, रोहिणी शिंदे, मलकापूरच्या माजी नगराध्यक्ष नीलम येडगे, कराडचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर आणि मलकापूरचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस सोनावले यांच्यासह भाजपाचे सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत. 

या सभेच्या निमित्ताने भाजपाने जोरदार शक्तीप्रदर्शनची तयारी केली असून, या सभेला कराड व मलकापूर शहरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाच्या शहराध्यक्ष सौ. सुषमा लोखंडे यांनी केले आहे. 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक