माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळ कार्यक्रम उत्सहात संपन्न...
कराड - आ.डॉ.अतुल भोसले यांचा सत्कार करताना मा. आनंदराव पाटील (नाना), माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष बंडा डुबल, युवा नेते मानसिंग पाटील, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, आर.टी.स्वामी आदी माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळ कार्यक्रम उत्सहात संपन्न... कराड, दि. 31 - साधू संत येई घरा तोची दिवाळी दसरा या आदर्श उक्ती प्रमाणे दरवर्षी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांचे निवास्थानी केले जाते. या स्नेह मेळाव्यास सातारा जिल्हा तसेच कराड तालूक्यातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित राहतात. नुकताच हा दिवाळी फराळ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ.अतुलबाबा भोसले, शिवाजी शिक्षण संस्था कराड अध्यक्ष जयंत काका पाटील, मा. नगरसेवक विनायक पावसकर, माजी सनदी अधिकारी श्रीनिवास जाधव, मा.संचालक निवासा अण्णा पाटील तांबवे तसेच कराड तालुका भाजपा अध्यक्ष धनाजी पाटील, माजी नगराध्यक्ष माधवराव पवार, जयवंतराव पाटील माजी नगराध्यक्ष कराड, जेष्ठ नेते पै.जगन्नाथ मोहिते बेलवडे, माजी पंचायत...