कृष्णा नर्सिंग’च्या ६४ विद्यार्थ्यांची ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निवड

कराड : कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूप्रसंगी बोलताना प्लेसमेंट सेलच्या प्रमुख डॉ. युगांतरा कदम. बाजूस डॉ. वैशाली मोहिते, मंगला लोखंडे, हकीम सिंग, साहस आवळे, पूजा रासल व कांचन केदार.

कृष्णा नर्सिंग’च्या ६४ विद्यार्थ्यांची ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निवड

कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मिळाली नोकरीची सुवर्णसंधी

कराड, ता. १७ : येथील कृष्णा विश्व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील ६४ विद्यार्थ्यांना ठाण्यातील सुप्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये नुकत्याच झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली असून, यामध्ये ५५ मुली व ९ मुलांचा समावेश आहे. 

या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी ज्युपिटर हॉस्पिटलच्या डेप्युटी नर्सिंग अधिकारी मंगला लोखंडे, नर्सिंग को-ऑर्डिनेटर हकीम सिंग, नर्स एज्युकेटर साहस आवळे, व्यवस्थापिका पूजा रासल आणि वरिष्ठ मॅनेजर कांचन केदार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी कृष्णा विश्व विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलच्या प्रमुख डॉ. युगांतरा कदम व कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी नर्सिंग पदवी, पदव्युत्तर, पदविका व जी.एन.एम. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या ६४ विद्यार्थी-विद्यार्थीनींची मुलाखतीद्वारे स्टाफ नर्स पदासाठी निवड करुन, त्यांना तत्काळ ऑफर लेटर प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना डॉ. कदम म्हणाल्या, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९८३ साली कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना केली. आप्पासाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा आज कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्ष झाला आहे. 

सद्य:स्थितीत कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये जी.एन.एम. नर्सिंग, बी.एससी. नर्सिंग, पोस्ट बी.एससी. नर्सिंग, नर्स प्रॅक्टिशनर इन क्रिटीकल केअर, एम.एससी. नर्सिंगसह पी.एचडी. अभ्यासक्रमासाठी अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. विशेषत: ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना या संस्थेमुळे नर्सिंग शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. या संस्थेत शिक्षण घेतलेले दोन हजारहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी ब्रिटन, आखाती देशांसह देशविदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलने नर्सिंग स्टाफच्या भरतीसाठी कृष्णा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन, या महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रशंसा केली असल्याचे उद्‌गार डॉ. मोहिते यांनी काढले.

याप्रसंगी प्लेसमेंट सेलचे तेसज भोसले, प्रकाशे नरेगल, अफसाना मुल्लाणी यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक