आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नाने उंडाळे प्रादेशिक योजनेसाठी तात्काळ निधी उपलब्ध होणार
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नाने उंडाळे प्रादेशिक योजनेसाठी निधी उपलब्ध होणार
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कार्यवाहीचे आदेश
कराड, ता. ७ : उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी भरघोस निधीची तरतूद करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज मुंबईत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन केली. यावेळी मंत्री ना. पाटील यांनी याबद्दल सकारात्मकता दर्शवित, तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
कराड दक्षिणमधील डोंगरी भागातील गावांसाठी राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरु केली. पण सातत्याने उद्भवणाऱ्या विविध अडचणींमुळे ही योजना पूर्णक्षमतेने कार्यान्वित झालेली नाही. ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात या भागातील गावांमध्ये पाण्यावाचून ग्रामस्थांचे मोठे हाल होतात.
उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्णक्षमतेने कार्यान्वित झाल्यास सुमारे ५० हजार लोकसंख्येला शाश्वत पाणीपुरवठा होणार आहे. तसेच काले, धोंडेवाडी, जखिणवाडी आणि कोयना वसाहतसह अन्य अनेक गावांनाही पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी एका निवेदनाद्वारे आ.डॉ. भोसले यांनी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे केली.
या मागणीबद्दल सकारात्कता दर्शवित, तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री ना. पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. त्यामुळे या भागातील पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments
Post a Comment