कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखा प्रमुखाच्या चुकीमुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी



गॅस पाईपलाईनच्या कामामुळे महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी

कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखा प्रमुखाच्या चुकीच्या नियोजनाचा वाहतुकीला फटका 

तहसीलदार आल्या, कामाची पाहणी करून गेल्या व मेसेज केला.

कराड, दि. 17 (प्रतिनिधी) दिवाळी सणाची सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर नाका येथे सिंगल व अरुंद रोडवर समर्थ हॉस्पिटल समोर गॅस पाईपलाईन जोडण्यासाठी खुदाई केल्याने याचा परिणाम कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर झाला. कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखाप्रमुख यांच्या चुकीच्या नियोजनामुळे ही वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या रांगा कोयना पुलापासून पाटण तिकाटण्यापर्यंत लागल्या होत्या. 

दरम्यान वाहतूक कोंडीच्या बातम्या सोशल माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली व त्यांनी पाईपलाईनच्या कामा ठिकाणी येऊन पाहणी केली. त्यानंतर तहसीलदार यांनी व्हाट्सअप ग्रुप वर सदर ठिकाणी प्रशासनाने भेट देऊन सदरचे काम बंद करण्यात येईल व अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत होईल अशी अशी पोस्ट (सव्वा एक वाजता) करून सांगितले. मात्र सदरचे काम अजूनही सुरूच होते. (साडे चार वाजले तरी)

कोयना पुला जवळ यापूर्वी मशीनच्या माध्यमातून गॅस पाईपलाईन कोल्हापूर नाक्याच्या दिशेने टाकण्यात आली होती तर संगम हॉटेल पासून पुढेही हॉटेल पंकज च्या दिशेने हि पाईपलाईन टाकण्यात आली होती. दोन्हीकडून येणाऱ्या पाईपलाईन या समर्थ हॉस्पिटल समोर जोडण्याच्या कामासाठी दोन दिवसापासून या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने खुदाई केली होती. (तत्पूर्वी मागील महिन्यात हॉटेल पंकज नजीक ही खुदाई करून पाईपलाईन जोडणी करण्यात आली होती) या कामाची पूर्वकल्पना कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखा प्रमुखांना होती, यासाठी त्यांनी पुढाकार घेत स्वतःहून उड्डाणपुलाखालून शहरात येणारा वाहतूक मार्ग बंद करून दुसऱ्या ठिकाणी सुरू केला होता. याची कल्पना डी पी जैन कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेलाही नव्हती.

दरम्यान काल रात्री उशिरा समर्थ हॉस्पिटल समोर गॅस पाईपलाईन जोडण्यासाठी अचानक कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखाप्रमुखांनी कराड शहरात उड्डाणपूला खालून येणारा मार्ग डी पी जैन कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेला कल्पना न देताच बंद करून गॅस पाईपलाईन चे काम सुरू करण्यास सांगितले. आज शुक्रवारी सकाळी डी पी जैन कंपनीचे सुरक्षा यंत्रणा कोल्हापूर नाक्यावर आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी शहरात येणारा मार्ग बंद असल्याचे दिसून आल्याने त्यांनी तो सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस गॅस पाईपलाईन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना अटकावा करत आम्ही वाहतूक नियंत्रण शाखा प्रमुखांना याबाबत कल्पना दिली असून त्यांनीच हा मार्ग बंद केल्याचे सांगितले. व संबंधित काम अर्ध्या तासात होईल त्यानंतर तुम्ही हा मार्ग सुरू करा असे त्यांनी सांगून काम चालू ठेवले याचा परिणाम आज सकाळपासून ट्रॅफिक जाम च्या माध्यमातून दिसून आला. 

एकूणच या कोल्हापूर नाका परिसरात दोन्ही बाजूला सध्या महामार्गाच्या व उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीचा नेहमीच बोजवारा उडत असतो. मात्र याची कल्पना कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखा प्रमुखांना असूनही त्यांनी वेळोवेळी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या चार चार कर्मचाऱ्यांना महामार्गावर, कोयना औद्योगिक वसाहत, महामार्ग पोलीस केंद्र, हॉटेल माळी परिसरात कारवाईसाठी थांबण्याचे आदेश रोजच्या रोज दिले जात आहेत. हे कर्मचारी साहेबांचा आदेश असल्याने कारवाईचे टार्गेट पूर्ण करत होते मात्र हे करत असताना वाहतूक विस्कळीत झाली तरीही हे कर्मचारी साहेबांनी सांगितलेल्या कामातच व्यस्त राहत होते व डी पी जैन कंपनीची सुरक्षा यंत्रणा वाहतूक सुरळीत करत होती व अजूनही करत आहे.

महामार्गावर जुन्या उड्डाणपुलाचे पाडकाम सुरू झाल्यानंतर व ते पूर्ण होईपर्यंत तत्कालीन पोलीस निरीक्षक बी आर पाटील व शहर वाहतूक नियंत्रण शाखाप्रमुख सरोजनी पाटील यांनी संयुक्तपणे महामार्गावर वाहतूक सुरळीत होण्याचे दृष्टीने गोल्डन पिक आवर राबवत वाहतूक सुरळीत ठेवली होती. मात्र सदरचे दोन्ही अधिकारी गेल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या अधिकाऱ्याकडून महामार्गावर वरील वाहतुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या अधिकाऱ्यांनी वाहतुकीची जबाबदारी डी पी जैन कंपनीकडे ढकलत आपली जबाबदारी झटकल्याचे दिसून येत आहे. 

व्हाट्सअप ग्रुपवर दिशाभूल करणारे चुकीचे मेसेज 

सध्याचे शहर वाहतूक नियंत्रण शाखाप्रमुख हे महामार्ग प्रशासनाच्या व्हाट्सअप ग्रुप वर वाहतुकीच्या अपघाताच्या व इतर अनुषंगाने दिशाभूल करणारे मेसेज पोस्ट करत असतात. उदाहरणार्थ मलकापूर परिसरात एक बस बंद पडल्याचा मेसेज पडल्यानंतर संबंधित बस तात्काळ कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेने बाजूला काढली होती. मात्र तरीही दुसऱ्या दिवशी त्याच बसचा फोटो टाकून तो मेसेज या 'वाहतूक शाखा प्रमुखांनी' पुन्हा टाकून सदरची बस काढली नसल्याचा मेसेज करून माझं किती लक्ष असतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या एका प्रसंगात चारच दिवसांपूर्वी सातारा लेनवर कोल्हापूर नाका ते पाचवड फाटा पर्यंत वाहतूक जाम झाली होती.(याचे कारण वेगळे होते) त्याबाबत संबंधित ग्रुप वर या वाहतूक शाखा प्रमुखांनी ढेबेवाडी फाटा येथे उड्डाणपूला खालील वाहतूक मार्ग बंद केल्याने वाहतूक जाम झाल्याचा चुकीचा मेसेज करून वरिष्ठांना आपण तत्पर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. (वास्तविक पिलर क्रमांक 57 ते खरेदी विक्री पेट्रोल पंप दरम्यान उड्डाणपुलाखाली दुभाजक व गटार बांधणीचे काम सुरू केल्याने पूलाखालील वाहतूक सेवा रस्त्यावर वळवली होती)

वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास 

कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेत अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत. मात्र सध्याचे वाहतूक नियंत्रण शाखा प्रमुख हे काही ठराविक कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याचे सदर कर्मचारी खाजगीत बोलत असतात. चार चार कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी कारवाईसाठी जाण्याचे आदेश देणे. महिला कर्मचाऱ्यांच्या बाबत ही हीच परिस्थिती आहे. ज्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना महामार्ग तसेच शहरातली पूर्ण माहिती आहे अशा कर्मचाऱ्यांना वर्दळीच्या ठिकाणी नेमणूक न देता गरज नसतानाही कारवाईसाठी नेमणूक दिली जाते असेही कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे. 

दरम्यान सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांनी अकार्यक्षम, निष्क्रिय अशा कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना तातडीने हटवून वाहतूक नियंत्रण शाखा ही सक्षम व तत्पर आणि जबाबदारीने सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांकडे द्यावी अशी मागणी वाहतूक शाखा कर्मचाऱ्यांसह नागरिकाकडून होत आहे.  

राजू सनदी, कराड 

(कराड वाहतूक नियंत्रण शाखेच्या अन्य भानगडी पुढील भागात)



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक