येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार - नामदेवराव पाटील


येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार - नामदेवराव पाटील

कराड, दि. 26 - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार असून याबाबत कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम न बाळगता एकजुटीने कामाला लागावे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जनतेच्या सहकार्याने विजय मिळवेल, असा विश्वास कराड दक्षिण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी व्यक्त केला. 

दिवाळी निमित्त आयोजित फराळ संवाद कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, युवानेते इंद्रजीत चव्हाण, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा वैशाली जाधव, गजानन आवळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रदीप जाधव, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नानासो जाधव, सातारा जिल्हा काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऍड. अमित जाधव, कराडचे माजी नगरसेवक अशोकराव पाटील, शिवाजी जमाले, रवि बडेकर, सुरेश भोसले, प्रदीप शिर्के आदीसह काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील म्हणाले की, काँग्रेस हा जुना व अनुभवी पक्ष असून आपल्याला या मतदार संघात काँग्रेसचे अनुभवी नेते लाभले आहेत यामुळे आजपर्यंत कराड दक्षिणचा योजनापूर्ण असा विकास होत गेला आहे. कराडला पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या रूपाने मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आणि त्या काळात व नंतरच्या आमदारकीच्या कार्यकाळात पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिणमध्ये करोडो रुपयांची विकासकामे आणली व कराडचा चेहरा-मोहराच बदलला. अजूनही अनेक विकास कामांची भूमिपूजन व उदघाट्न सुरु आहेत. 

यावेळी इंद्रजीत चव्हाण, ऍड. अमित जाधव, अजितराव पाटील, वैशाली जाधव, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव दिग्विजय सूर्यवंशी आदींची भाषणे झाली. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक