माजी आमदार आनंदराव पाटील यांच्याकडून अर्बन बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
माजी आमदार आनंदराव पाटील यांच्याकडून अर्बन बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
कराड, दि. 14- दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड बँकेच्या अध्यक्षपदी श्री. समीर जोशी व उपाध्यक्षपदी श्री. शशांक पालकर यांची निवड झाल्याबद्दल विधान परिषद सदस्य माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनी बँकेस सदिच्छा भेट देवून नवनिर्वाचीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
यावेळी अर्बन कुटुंबप्रमुख श्री. सुभाषराव जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, बँकेचे संचालक चंद्रकुमार डांगे, डॉ. राहुल फासे, मानसिंगराव पाटील उपस्थित होते.
श्री. आनंदराव पाटील (नाना) म्हणाले, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी बँकेच्या कामकाजातील पारदर्शकता टिकवून ठेवली आहे. बँकेने सामाजीक उपक्रमांबरोबरच ग्राहकांसाठी अल्प व्याजदराच्या विविध कर्ज योजना याशिवाय महिला केंद्रीत पर्यटन उद्योग (आई) कर्ज योजना राबवित ग्राहक हीत जोपासले आहे. कराड अर्बन बँक नेहमीच सर्वोत्तम ग्राहक व केंद्रबिंदू माणून सेवा देत आली आहे. त्यामुळेच सहकार क्षेत्रात अर्बन बँक ही आग्रेसर राहिली आहे. बँकेने ग्राहक हा केंद्रस्थानी ठेवून कारभार केल्यानेच अर्बन बँक ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. यापुढील काळातही संचालक मंडळाने बँकेची उत्तरोत्तर प्रगती साधण्यासाठी प्रयत्नशील रहावे. गेल्या दोन दशकात बँकेच्या वाटचालीचा पाया आर्थिकदृष्टया सक्षम व विस्तृत केला आहे. त्याचमुळे बँक आज ६००० कोटी व्यवसायपूर्तीकडे वाटचाल करीत ग्राहकांच्या विश्वासास कायम पात्र ठरली आहे. असे मत श्री. आनंदराव पाटील (नाना) यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

Comments
Post a Comment