कराडच्या तिघांकडून तीन पिस्तूल हस्तगत; साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त
व्यावसायिक अनिल चंदवानीच्या मुलासह दोघांना तीन पिस्तूलसह अटक; सातारा पोलिसांची कराड नजीक कारवाई
तीन देशी बनावटीच्या पिस्तूल व काडतुसे, मोबाईल हॅन्डसेट व कार असा साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कराड, दि. 20 - कराड शामगाव रोडवर काल रविवार दि. 19 रोजी रात्री सातारा पोलिसांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना मुद्देमालासह अटक केली आहे. यामध्ये व्यावसायिक अनिल चंदवानीच्या मुलासह अन्य दोघांचा समावेश असून या तिघांकडून साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हे तिघेही कराड शहर व परिसरात राहणारी असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व सध्या चालु असलेल्या दिवाळी सणाचे अनुशंगाने विशेष मोहिम राबवुन विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिल्या होत्या. त्यानुसार सातारा पोलिसांनी कराड शामगाव रोडवर विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना तीन पिस्तूल व जिवंत काडतूसासह अटक केली आहे. या तिघांच्या कडून साडेआठ लाख रुपयांचा मूल्यमाला हस्तगत केला आहे
कार्तीक अनील चंदवानी (वय 19) रा. लाहोटी नगर, मलकापुर, ता. कराड, ऋतेष धर्मेंद्र माने (वय-22) रा.कृष्णा अंगण, वाखान रोड, कराड, अक्षय प्रकाश सहजराव (वय-28) रा. लाहोटी नगर, मलकापुर, कराड अशा या तीन आरोपींची नावे आहेत.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व त्यांचे पथक रविवारी दिनांक 19 रोजी कराड शहर, कराड तालुका व मसुर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध पेट्रोलींग करीत होते. दरम्यान या पथकाला गोपनिय बातमीदारचे मार्फत बातमी मिळाली की, काही इसम त्यांचेकडील ब्रीझा कार क्रमांक एमएच-50-एल-4289 मधुन अवैध शस्त्रांची वाहतुक करणार आहेत.
दरम्यान माहिती मिळताच शामगाव घाट ते कराड शहर जाणरे रोडवर करवडी येथे सापळा लावला. त्यानंतर थोड्याच वेळात मिळाले बातमीतील कार पथकाचे दिशेने येत असताना दिसल्याने पथकतील पोलीस स्टाफने सदर कारला कार आडवी मारुन कार थांबवुन कारमधील तीन इसमांना शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचेकडे विचारपूस करुन त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडुन 3 देशी बनावटीच्या मॅग्झीनसह पिस्तूल व 3 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल हॅन्डसेट व ब्रीझा कार असा एकुण आठ लाख 51 हजार पाचशे रुपय किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन कराड तालुका पोलीस ठाणे येथे अवैध शस्र बाळगले बाबत गुरनं. 681/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3(1), 25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

Comments
Post a Comment