आ. डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नाने कराड शहराला पुन्हा एकदा पाच कोटी 90 लाखांचा निधी मंजूर


आ. डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नाने कराड शहराला पुन्हा एकदा 5 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर 

कराड, ता. २४ : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा योजनेअंतर्गत तब्बल ५ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या निधीतून शहरातील विविध ३२ विकासकामांना जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

कराड शहराच्या नागरी विकासासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शासन व जिल्हा प्रशासन पातळीवर पाठपुरावा करत आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून कराड शहराला कोट्यवधींचा निधी खेचून आणण्यात आ.डॉ. भोसले यांना यश मिळत असून, यामुळे शहराच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळत आहे. 

आ.डॉ. भोसले सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कराड नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान २०२५–२६ अंतर्गत ३ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील विविध १८ विकासकामे साकारली जाणार आहेत. यामध्ये कराड शहरातील एकनाथ बागडी यांच्या घरापासून ते हेड पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण (२२.४१ लाख), खराडे कॉलनीतील सूर्यकांत खराडे ते नूर मशीद रस्ता डांबरीकरण (१६.६२ लाख), तवर गल्ली महादेव मंदिर येथील संरक्षण भिंतीवरील बाजूस सिमेंट काँक्रीट करणे व रेलिंग बसविणे (२७.२६ लाख), त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरण (१४.५७ लाख), गुरुवार पेठेतील आदम पालकर यांचे घर ते गजराज भेळपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटर करणे (९.६९ लाख), शनिवार पेठेतील गेट नं. १ पासून बैल बाजार रोड लक्ष्मी नारायण चौक ते अजंठा पोल्ट्रीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण (१.५६ कोटी), शनिवार पेठेतील श्री. कुलकर्णी यांचे घर ते श्री. मुथा यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण (११.९९ लाख), सोमवार पेठेतील चांडक दुकानासमोर श्री. चांदोरकर घर ते श्री. वाटेगावकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण (३.६९ लाख), वाकाण रोड दक्षिण बाजूस ५ कॉलनीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी १० बाकड्यांची व्यवस्था (९५ हजार), जितेंद्र पानवळ ते प्रवीण वाघमारे यांच्या घराच्या पुढे पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण (२८.११ लाख), संत झुलेलाल मंदिर ते शार्दुल देशपांडे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण (३३.७८ लाख), सात शहीद चौक ते संत तुकाराम हायस्कूलपर्यंत बंदिस्त गटार करणे (१३.६६ लाख), सोमवार पेठेतील काळा मारुती मंदिरासमोरील श्री. ग्रामोपाध्ये यांच्या घरासमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण (१.७३ लाख), श्री. देशपांडे पानवठा ते राहुल पवार घर ते प्रसाद कदम घर ते साठे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण (४.३९ लाख), भैरोबा गल्ली उमराणी घर ते कारंजकर घर रस्ता काँकीटीकरण (२.२७ लाख), भैरोबा गल्ली ते फडणवीस यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण (२.२९ लाख), वेदांत रेसिडन्सी येथील सचिन कदम यांच्या घरासमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण (१.४२ लाख), विराग जांभळे यांचे घर ते मोहन जोशी यांच्या घरासमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण (३.५४ लाख) अशी एकूण ३ कोटी ५६ लाखांची विकासकामे करण्यात येणार आहेत. 

तसेच नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा अंतर्गत २ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील विविध १४ विकासकामे साकारली जाणार आहेत. यामध्ये कराड नगरपरिषद हद्दीतील कार्वे नाका एकलव्य नगर काँक्रीट रस्ता व गटार करणे (३४.२८ लाख), शनिवार पेठेतील ४२३/३ सुपर मार्केट जयभारत कॉलनी येथील रस्ता डांबरीकरण करणे (१५.६९ लाख), शनिवार पेठेतील श्री ट्रॅक्टर गॅरेजजवळ आरसीसी गटर बांधणे (१८.६२ लाख), शुक्रवार पेठेतील सात शहीद चौक ते रोहित ठोंबरे यांच्या घरापासून ते गजानन भोपते यांच्या प्लॉटपर्यंत तसेच प्रमोद शेलार यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटर करणे (१५.१३ लाख), सोमवार पेठेतील अंबाबाई मंदिरासमोर कीर्तीकुमार ओसवाल यांच्या घरासमोरील रस्ता काँक्रीट करणे (१.१३ लाख), जुनी रॉयल टॉकीजच्या मागील बाजूस श्री. मानकर घर ते मुख्य रस्त्यापर्यंत जाणारा रस्ता काँक्रीट करणे (५.२० लाख), श्री. कलबुर्गी घरासमोरील ते श्री. पंचवाघ घराशेजारील रस्ता काँक्रीट करणे (१.३० लाख), पोस्टल कॉलनी मेन पोस्टल बोर्ड ते बाळासाहेब कांबळे घरापर्यंत बंदिस्त गटार करणे (२०.७८ लाख), वाढीव भाग रेव्हन्यू कॉलनी अंतर्गत मेन रस्ता डांबरीकरण करणे (२८.६३ लाख), शिवाजी हौसिंग सोसायटी व प्रकाशनगर तसेच कराड शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे (३४.९५ लाख), अजंठा चौक ते दैत्यनिवारणी माता मंदिर स्ट्रीट लाईट बसवणे (४.९२ लाख), पाटण कॉलनीमधील परिसरात स्ट्रीट लाईट बसवणे (९.९६ लाख), मंगळवार पेठेतील वीर घर ते संभाजी निर्मळ घर काँक्रीट रस्ता करणे (९.२४ लाख), वाकाण रोड अशोक विहार रणजीत नगरमधील दोन्ही बाजूस बंदिस्त गटार तयार करणे (३४.३१ लाख) अशी एकूण २ कोटी ३४ लाखांची विकासकामे करण्यात येणार आहेत. 

या निधीच्या मंजुरीमुळे कराड शहरातील रस्ते, गटारे आणि पायाभूत सुविधा सुधारण्याचे काम वेगाने होणार असून, नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे. या निधी मंजुरीबद्दल शहवासीयांकडून आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.

कराड शहरातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा देण्यास माझे नेहमीच प्राधान्य आहे. महाराष्ट्र नगरोत्थान योजनेतून आणि नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा योजनेअंतर्गत मिळालेल्या ५ कोटी ९० लाखांच्या या निधीमुळे नागरी वस्त्यांमध्ये पायाभूत विकासाला चालना मिळणार आहे. प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने ही सर्व कामे दर्जेदारपणे आणि वेळेत पूर्ण केली जातील.

- आ.डॉ. अतुलबाबा भोसले
जिल्हाध्यक्ष, भाजपा

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक