कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात २.२४ कोटींच्या प्रशासकीय कामांना मंजुरी


कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात २.२४ कोटींच्या प्रशासकीय कामांना मंजुरी

कराड, दि. 27 : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुधारणा, नवीन डीपी बसविणे, वीजवाहिन्यांचे स्थलांतर, नवीन पोल उभारणी आदी कामांसाठी २.२४ कोटींच्या प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल २४ गावांमधील ३२ विविध विकासकामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

कराड दक्षिणमधील गावांचा वीजपुरवठा अधिक सक्षम व्हावा आणि त्यादृष्टीने आवश्यक कामांची पूर्तता व्हावी, यासाठी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी महावितरण विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या समन्वयातून विविध गावांमधील विकासकामे सूचविली होती. या अनुषंगाने कराड दक्षिणमधील २४ गावांमधील तब्बल ३२ विविध कामांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. 

या अंतर्गत आटके ते जाधवमळा आणि आटके ते रेठरे खुर्द रस्ता नुतनीकरण झाल्याने शेजारील विद्युत वाहिनी जादा उंचीवर टाकणे व विद्युत खांब बदलणे (१३.६७ लाख), कार्वे येथील आनंदमळा येथे नवीन डीपी बसविणे (८.१५ लाख), कालेटेक येथे म्हसोबा मंदिरासमोरील दोन पोल स्थलांतरीत करणे (८७ हजार), कासारशिरंबे येथील मराठी शाळा ते जोतिबा मंदिर रस्त्यामधील विद्युत पोल स्थलांतरीत करणे (१.५१ लाख), कुसूर येथे विद्युत पुरवठा सुधारणासाठी नवीन डीपी बसविणे (८.३० लाख), गोटेवाडी गावठाणमधील वाढीव वस्तीला नवीन विद्युत जोडणी देण्यासाठी नवीन पोल उभारणे (३.६८ लाख), गोटेवाडी येथील मुळीकवाडी येथे विद्युत पुरवठा सुधारणासाठी नवीन डीपी बसविणे (१४.१६ लाख), गोळेश्वर येथील थोरात हॉस्पिटल परिसरातील १५ ते २० घरावरुन गेलेल्या उच्चदाब वाहिन्या व डीपी शिफ्ट करणे (१२.०१ लाख), गोवारे येथे गजानन हौसिंग सोसायटी येथील गणेश मंदिर आवारातील डीपी स्थलांतरीत करणे (९.०३ लाख), घोगाव येथील बेघर वस्तीमध्ये विद्युत कनेक्शनसाठी नवीन पोल उभारणे (१.४७ लाख), जुळेवाडी गावठाणमधील वाढीव वस्तीमध्ये विद्युत कनेक्शन देणेसाठी नवीन ३२ पोल बसविणे (८.१५ लाख), जुळेवाडी येथे गोंदी विहीरीजवळ विद्युत पुरवठा सुधारणासाठी नवीन डीपी बसविणे (८.१७ लाख), जुळेवाडी येथे घरावरुन नेण्यात आलेल्या विद्युत लाईन स्थलांतरीत करणे (३.५० लाख), दुशेरे प्राथमिक शाळेजवळ व चैनीमळा येथे विद्युत पुरवठा सुधारण्यासाठी प्रत्येकी एक नवीन डीपी बसविणे (२३.१६ लाख), नांदगाव येथील कालवडे खिंड येथे पाणंद रस्त्यामध्ये अडथळा असणारा पोल स्थलांतरीत करणे (१.०७ लाख), नांदलापूर लोकवस्तीवरील विद्युत वाहिनी स्थलांतरीत करणे (३.६५ लाख), पोतले येथील जुने गावठाण येथे महादेव मंदिराजवळ नवीन डीपी बसविणे (१०.४० लाख), बेलवडे बुद्रुक येथील मारुती मंदिराजवळ नवीन डीपी बसविणे (९.८९ लाख), भुरभूशी येथील काजरवाडी येथे नवीन डीपी बसविणे (१३.८५ लाख), येणके येथे विद्युत पुरवठा सुधारण्यासाठी नवीन डीपी बसविणे (१०.४९ लाख), येरवळे येथील लोकवस्तीवरील विद्युत वाहिनी स्थलांतरीत करणे (१.८२ लाख), वहागाव येथील घोणशी-खोडशी हद्दीजवळ नवीन डीपी बसविणे (७.१६ लाख), वाठार येथे विद्युत पुरवठा सुधारणासाठी नवीन २ डीपी बसविणे (१५.३५ लाख), वारंजी येथे नवीन डीपी बसविणे (८.९९ लाख), विठोबाचीवाडी येथे लोकवस्तीतील डीपी स्थलांतरीत करणे (१५ लाख), शेळकेवाडी (म्हासोली) येथे २ नवीन पोल उभारणे (४.०९ लाख), साळशिरंबे येथे ४ नवीन पोल उभारणे (६.६२ लाख) अशी एकूण २ कोटी २४ लाख २१ हजारांची विकासकामे केली जाणार आहेत. याबाबतचा शासन आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नुकताच प्रसारित केला असून, मंजूर कामांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) मार्फत केली जाणार आहे. 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांच्या मालिकेत ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा अधिक सक्षम होण्यासाठी उचललेले हे एक महत्वाचे पाऊल ठरले आहे. या निधीच्या मंजुरीमुळे पुढील काही महिन्यांत गावागावात वीजपुरवठा अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि स्थिर होण्यास मदत होणार आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे हा निधी उपलब्ध केल्याबद्दल ग्रामस्थांमधून महायुती सरकार आणि आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार मानले जात आहेत. 

विद्युत पुरवठा सुदृढतेसाठी केली जाणारी कामे 

• जुन्या वीजवाहिन्यांचे स्थलांतर आणि उंची वाढविणे

• नवीन डीपी बसविणे

• नवीन पोल उभारणे

• गावठाण भागात नवीन जोडण्या देणे

कराड दक्षिण मतदारसंघातील गावांचा वीजपुरवठा अधिक सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. महावितरण विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या समन्वयातून या २४ गावांमध्ये २.२४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि घरगुती ग्राहक यांना मोठा दिलासा मिळेल, याची मला खात्री आहे. 

- आ.डॉ. अतुलबाबा भोसले, जिल्हाध्यक्ष, भाजपा

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक