अथणी रयत शुगर्स कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

 

अथणी रयत शुगर्स कारखान्याचा गळीत हंगामाचे ऊस मोळी पूजन कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील - उंडाळकर व अथणी शुगरचे  संचालक योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते सपन्न झाला . यावेळी संचालक मंडळ, शेतकरी, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

अथणी - रयत शुगर्स चे आणखी प्रति मे.टन रू.६०/- प्रमाणे ऊस बिल

एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांची माहीती

कराड दि, 20 - शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स (रयत युनिट) या साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसास प्रति मे.टन रू ३२००/- प्रमाणे ऊस बिल यापूर्वी अदा केले आहे.आणखी प्रति मे.टन रू.६०/- ऊस बिल देणार असल्याची माहीती अथणी शुगर्सचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सी.एफ.ओ योगेश पाटील यांनी दिली. 

 यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड उदयसिंह पाटील-उंडाळकर, अथनी शुगर्सचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सी.एफ.ओ योगेश पाटील आणि युनिट हेड रविन्द्र देशमुख उपस्थित होते.

अथणी शुगर्स लि. (रयत युनिट) या कारखान्याने गळीत हंगाम सन २०२४-२५ मध्ये ४.४४ लाख मे.टन गाळप केलेले असून या ऊसाला प्रति मे.टन रू.३२००/- प्रमाणे एकरकमी ऊसबिल अदा केलेले आहे. तसेच सर्व ऊस पुरवठादार शेतक-यांनी पुरवठा केलेल्या प्रति मे.टन ऊसाला रू.२०/- प्रति किलो या सवलतीच्या दराने साखर वितरण करण्यात येत आहे. यामुळे किरकोळ बाजारातील साखरेचा प्रति किलो रू.४० ते ४२ दर विचारात घेता शेतक-यांना या माध्यमातून रू.२०/-इतका वाढीव दर अप्रत्यक्षपणे मिळालेला आहे.

सर्व ऊस पुरवठादार शेतक-यांना कळविण्यास आनंद होतो की, व्यवस्थापनाने २०२४-२५ हंगामात गाळप केलेल्या ऊसाला प्रति मे.टन रू.६०/- प्रमाणे दुस-या हप्त्याचे बिल देण्याचे जाहीर केली आहे व त्यापोटीची रक्कम लवकरच सर्व संबंधित शेतक-यांच्या बँक खाती वर्ग करण्यात येणार आहे. परिणामी २०२४-२५ या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला प्रति मे.टन एकूण रू.३२८०/- इतका ऊस दर देण्यात आलेला आहे. तरी सर्व ऊस पुरवठादार शेतक-यांनी गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पुरवठा करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक