शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड आणि माय कन्सोल यांच्यात सामंजस्य करार...
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड आणि माय कन्सोल यांच्यात सामंजस्य करार... कराड दि.31-:- येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने पर्यावरणीय शाश्वतता वाढीस लावणे तसेच हरित उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने लंडन युनायटेड किंगडम येथील पर्यावरण, सामाजिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातील कंपनी माय कन्सोल यांचे सोबत नुकताच सामंजस्य करार केला. महाविद्यालयाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर भालसिंग यांचे धोरण नेहमीच पर्यावरण पुरक असुन त्यांचेकडुन संस्थेला पर्यावरणाच्या जागरूकतेबाबत वेगवेगळ्या माध्यमांतून वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सामंजस्य कराराबाबत अधिक माहिती देताना मोरेश्वर भालसिंग म्हणाले की "शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात भरीव वाढ व जागरूकता वाढवणे तसेच पर्यावरण पूरक महाविद्यालयीन आवर तयार करणे, पर्यावरण पूरक घटकांचा अभ्यासक्रमात सहभाग करणे, उद्योगाकरिता केस स्टडीज विकसित करणे ह्या काही प्राथमिक उद्दिष्टांचा सामंजस्य करारात समावेश आहे." याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कंपनीचे संचालक निरंजन वाघमारे म्हणाले " आम्ही या संस्थेस आमचे योगदान देण्यास व सकारात्मक बदल...