कराड शहर डीबी पथकाने तडीपार इसमास केले जेरबंद...
कराड शहर डीबी पथकाने तडीपार इसमास केले जेरबंद...
कराड दि.20-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड शहर डीबी पथकाने जखिनवाडी येथील एका तडीपार इसमास जेरबंद केले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कराड शहर परिसरात तडीपार इसमांची माहिती काढून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार जखिनवाडी येथील पृथ्वीराज येडगे (वय 29) यास जेरबंद करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी आगामी निवडणुका पाहता कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना कराड शहरात तडीपार इसमांची माहिती काढून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक कुलदीप कोळी, संतोष पाडळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख, मुकेश मोरे दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील यांची या कामगिरीसाठी विशेष नियुक्ती केली होती.
काल मंगळवार दिनांक 19 मार्च रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार बिरोबा मंदिर जखिनवाडी (ता. कराड) येथे दोन वर्षासाठी तडीपार असलेला पृथ्वीराज येडगे हा त्या ठिकाणी आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व त्यांच्या पथकास याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदर पथकाने बिरोबा मंदिर जखिनवाडी येथे सापळा रचून तडीपार पृथ्वीराज बळवंत येडगे (वय 29) यास जागेवरच ताब्यात घेतले. त्याबाबत कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित पवार व डीबी टीम करीत आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक कुलदीप कोळी, संतोष पाडळे पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment