लोकसभा निवडणुकीची घोषणा; 7 टप्प्यात होणार निवडणूक...
लोकसभा निवडणुकीची घोषणा; 7 टप्प्यात होणार निवडणूक...
नवी दिल्ली दि. 16-केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज लोकसभा निवडणुकीची घोषणा मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केली असून लोकसभेची निवडणूक टप्प्यात 7 होणार आहे. त्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात तर 20 मे रोजी शेवटचा टप्पा असणार आहे. देशात पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला होणार असून 4 जूनला सर्व मतमोजणी होणार आहे.
आज 16 मार्चपासून आचारसंहिता सुरू. 12 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरले जाणार, 20 एप्रिल छाननी, 22 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत, 4 जून रोजी निवडणूक निकाल लागणार आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या पाच टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व मतमोजणी 4 जून ला होणार आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होत असून यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे.
तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या जिल्ह्यात मतदान होणार आहे.
चौथा टप्प्यात 13 मे रोजी नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जिल्ह्यात मतदान होणार आहे.
पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई या जिल्ह्यात मतदान होणार आहे.
देशात 7 टप्प्यात मतदान होणार असून सर्व जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी चार जूनला होणार आहे. पहिल्या टप्प्यात तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तरखंड राज्यात 19 एप्रिल ला मतदान होणार आहे.
पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे, सातवा टप्पा 1 जून असणार आहे.
या लोकसभा निवडणुकीत 96.8 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये 49.7 कोटी पुरुष मतदार तर 47.1 कोटी महिला मतदार आहेत. तर 1.2 कोटी प्रथम मतदार असणार यामध्ये 48 हजार तृतीयपंथी यांचा समावेश आहे. 18 ते 21 वयोगटातील मतदारांची संख्या 21.50 कोटी आहे. वय वर्ष 100 व त्यावर वय असणारे देशात दोन लाख मतदार आहेत.
देशात 12 राज्यात पुरुषापेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. देशात साडे दहा लाखापेक्षा अधिक मतदान केंद्र असणार आहेत व या केंद्रावरती 55 लाखापेक्षा अधिक इलेक्ट्रिक वोटिंग मशीन उपलब्ध केली जाणार असल्याचेही राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या निवडणुकीत 1.82 कोटी तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. देशात 65 वर्षापेक्षा जास्त वय असणारे 82 लाख मतदार आहेत.
या निवडणुकीत ज्यांचं वय 85 वर्षापेक्षा अधिक आहे आणि जे दिव्यांग आहेत त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे त्यासाठी संबंधितास एक फॉर्म भरून द्यावा लागेल त्यानंतर मतदानादिवशी संबंधित मतदाराच्या घरी मतपेटी नेली जाईल असेही राजीव कुमार यांनी सांगितले.
या निवडणुकीत प्रमुख चार आव्हाने असणार असून त्यामध्ये मसल पावर, मनी पावर, हिंसा व अफवा रोखण्याचे सगळ्यात मोठं आव्हान आयोगाच्या समोर असून त्यासाठी त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना योग्य पद्धतीच्या सूचना दिल्या असल्याचेही कुमार यांनी सांगितले. निवडणुकीत जर का कुठे पैसे वाटप सुरू असेल, गैरप्रकार सुरू असेल तर त्यासंबंधी फोटो काढून दिलेल्या ॲप वर टाकल्यास त्या मोबाईलच्या अक्षांश रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून आयोगाची टीम तासाभरात त्या ठिकाणी पोहोचेल असेही कुमार यांनी सांगितले.
या निवडणुकीत मतदानाच्या काळात सोशल मीडियावर काही अफवा मोठ्या प्रमाणे पसरवल्या जातात. त्यामुळे समाजात वातावरण खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर कोणत्याही सोशल नेटवर्कवर काही आक्षेपार्य पोस्ट असेल की ज्याच्यामुळे निवडूनुकीचे तसे समाजातील वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. संबंधित त्या सर्व सोशल मीडियावरच्या पोस्ट काढून टाकण्याचा अधिकार प्रत्येक राज्य सरकारला दिले असल्याची माहिती ही कुमार यांनी सांगितली. लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी आरोप करताना किंवा वापरली जाणारी भाषा व त्याचा जर स्तर घसरल्यास निवडणूक आयोगाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले. स्टार प्रचारकांना त्यासाठी काही नियमावली असणार आहे.
जो मतदार अपंग असेल त्याचे अपंगाचे प्रमाण हे 40% पेक्षा जास्त असेल तर त्या मतदारासाठी फॉर्म १२ डी देण्यात येणार असून अशा मतदारांना हा फॉर्म त्यांच्या घरपोच देण्यात येणार आहे.
सध्याच्या लोकसभेचा कालावधी हा 16 जून 2024 पर्यंत आहे. एकूण 543 जागांसाठी निवडून होणार असून कमीत कमी 272 जागांची बहुमतासाठी आवश्यकता असणार आहे.
राजू सनदी, कराड


Comments
Post a Comment