कराड डी बी ने अवैधरित्या दारूची वाहतूक पकडली;सात लाखाचा मुद्देमाल जप्त करीत एकास अटक...
कराड डी बी ने अवैधरित्या दारूची वाहतूक पकडली;सात लाखाचा मुद्देमाल जप्त करीत एकास अटक...
कराड दि.24-सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या काळात कराड शहर डी.बी. पथकाने बैकायदेशीर दारु वाहतुकीवर मोठी कारवाई करीत एका बोलेरो गाडीसह एकुण सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ऋषिकेश दिलीप कणसे (वय 26) रा. शेणोली यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड बैल बाजार मलकापूर रोडवर अवैधरित्या दारूची वाहतूक बाबत मिळालेल्या माहितीनुसार कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व त्यांच्या टीमने गोकाक पेट्रोल पंपा जवळ सापळा रचुन सापळा रचून बोलेरो गाडी अडवात झडती घेतली असता त्यामध्ये एकुण 1 लाख 16 हजार 160 किंमतीची विदेशी दारुसह ऋषिकेश दिलीप कणसे वय 26 वर्षे रा. शेणोली ता. कराड यास ताब्यात घेतले.सदर कारवाईत एक बोलेरो गाडीसह एकुण सात लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा डिसले, सफौ रघुवीर देसाई, सफौ संजय देवकुळे, पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो.शि.संग्राम पाटील, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे. महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.


Comments
Post a Comment