साहेब पाठीवर मारा पण पोटावर मारू नका; हॉकर्स संघटनेची नगरपरिषदेकडे आर्त हाक...


साहेब पाठीवर मारा पण पोटावर मारू नका; हॉकर्स संघटनेची नगरपरिषदेकडे आर्त हाक...

कराड दि.29-शहरातील रस्त्यावरील सर्वे झालेल्या व्यावसायिकांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना आहे त्या जागेवरून हाकलू नये असा आदेश असतानाही कराड नगर परिषदेने अतिक्रमण मोहीम राबवून सरसकट व्यवसायिकांना हटवले आहे. त्यामुळे फक्त सर्वे झालेल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी यासाठी कराड हॉकर्स संघटना आक्रमक झाली आहे. त्यामुळे साहेब पाठीवर मारा पण पोटावर मारू नका अशी अशी आर्त हाक हॉकर्स संघटनेने कराड नगरपरिषदेकडे केली आहे.

कराड शहरात हातगाडे वाढत असलेने अडचण होत आहे. परंतु सुप्रीमकोर्टाचे आदेशाप्रमाणे पालिकेकडून समिती नेमली गेली नाही व हॉकर्स झोनची निर्मितीही केली नाही. कोर्टाचे आदेशाप्रमाणे 2014 पर्यन्त हॉकर्स धारकांचा ऑनलाईन सर्वे झाला आहे. परंतु त्यांना ओळखपत्र दिले गेले नाही. त्यामुळे नवीन हातगाडे वाढत आहेत. सर्वे झालेल्या लोकांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना आहे त्या जागेवरून हाकलू नये असा आदेश आहे. 

दरम्यान कराड नगरपालिकेने शहरातील सर्वे झालेल्या व्यावसायिकांना आहे त्या जागेवर व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी व मर्यादित जागेत व्यवसाय करण्याच्या सूचना पालिका, पोलीस व संघटनेचे पदाधिकारी देतील असे आश्वासन देण्यास हॉकर्स संघटना बांधिल असेल व दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांचे हातगाडे कोणतेही करण न एकता हातगाडे जप्त करण्यात यावेत या अटीवर व्यवसाय चालू राहतील अशी ग्वाही संघटनेचे अध्यक्ष व व्यावसायिक देत आहेत.

साहेब पाठीवर मारा पण पोटावर मारू नका अशी आर्त हाक देत हॅकर संघटनेचे पदाधिकारी व व्यावसायिकांची कळकळीची विंनती असून या व्यवसायावर आमचे पोट चालते, मुलांचे शिक्षण व शासनाने यांना फेरीवाला योजनेतून दिलेल्या कर्जाची परतफेड होते. त्यामुळे यावर त्वरित विचार व्हावा व व्यावसायिकांना आपला व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी कराड नगरपरिषदेकडे हॉकर्स संघटना करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी कराड टूडेशी बोलताना सांगितले.

राजू सनदी कराड 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक