तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम...


तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम...

तळमावले दि.23-जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी क्षयरोगाबाबत जनजागृती करुया व आपले गाव क्षयरोगमुक्त करण्यास मदत करुया, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी आर. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पवार, डॉ नितीन वांगीकर यांनी केले.

दि. २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येतो. भारतात क्षयरोगाचे परिणाम अधिक असून दररोज ४० हजारांहून अधिक व्यक्तींना क्षयरोगाच्या जंतूंचा संसर्ग होतो. दररोज एक हजारपेक्षा जास्त रुग्ण क्षयरोगामुळे मरण पावतात.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले व उपकेंद्र गुढे, काढणे, कुंभारगाव, खळे येथे जनजागृती आभियानात दोन आठवडे पेक्षा खोकला, वजन कमी होणे, भुक मंदावणे, मानेवर गाठ या प्रकारे आरोग्य शिक्षण दिले तसेच प्रभात फेरी काढण्यात आली.

क्षयरुग्ण हे नवीन थुंकी दूषित असतात व उरलेले थुंकी अदूषित असतात. या नवीन थुंकीदूषित क्षयरुग्णांमधील साधारणतः सहा टक्के क्षयरुग्ण मृत्यू पावतात. नवीन क्षयरुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण ८५ ते ९० टक्के आहे. क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार असल्याने या आजाराचे जंतू कोणाच्याही शरीरात प्रवेश करु शकतात व क्षयरोग होऊ शकतो. क्षयरोग झाला म्हणून घाबरु नका. हा आजार सरकारी दवाखान्यात सहा ते आठ महिन्यांच्या उपचाराने बरा होतो. हा उपचार पूर्ण मोफत उपलब्ध असून प्रत्येक रुग्णासाठी सहा ते नऊ महिन्यांचे औषधोपचार अखंडित सुरु ठेवावे असे आवाहन करण्यात आले. 

यावेळी तालुका STLS हणमंत यादव, पाटील मँडम, आरोग्य सहाय्यक शरद कांबळे, जामसिंग पावरा, औषध निर्माण अधिकारी दिपाली चव्हाण, समुदाय आरोग्य अधिकारी नितीन माने, अकबर मुल्ला, सुप्रिया यादव, धैर्यशील सपकाळ, आरोग्य सेवक रोहीत भोकरे, स्वप्निल कांबळे, विलास फाळके, आरोग्य सेविका रजना कुंभार, विद्या लोहार, सोनाली परीट, सुप्रिया पवार व तळमावले च्या सर्व आशा सेविका गटप्रवर्तक वैशाली डुबल, कोमल महादर, निलम काजारी उपस्थित होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक