कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; बेकायदेशीरत्या प्रवेश करणाऱ्या तडीपार आरोपीच्या मुस्क्या आवळल्या...
कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; बेकायदेशीरत्या प्रवेश करणाऱ्या तडीपार आरोपीच्या मुस्क्या आवळल्या...
कराड दि.24-सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिया दरम्यान बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या व सातारा सांगली जिल्ह्यातून तडीपार असणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने रेठरे खुर्द येथे मुस्क्या आवळल्या आहेत. महादेव बाळासो कोळी (वय 36) रा. किल्लेमच्छिद्रगड असे या तडीपार इसमाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील फरारी/पाहिजे व तडीपार तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करुन त्याचेवर कडक कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने कडक कारवाई करणेबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.
काल दि. 23 रोजी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना त्याचे विशेष गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, कराड तालुका पोलीस ठाणे अभिलेखावरील तडीपार इसम महादेव कोळी हा रेठरे कारखाना परीसरात विनाकारण फिरत आहे. त्यानुसार जगताप यांनी त्याला ताब्यात घेवुन त्याचेवर कडक कारवाई करणेबाबत कराड तालुका पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकास सांगितले. त्यानुसार डीपी पथकाने मिळालेल्या माहिती वरून सापळा लावुन तडीपार महादेव बाळासो कोळी (वय 36) रा. किल्लेमच्छिद्रगड ता. वाळवा जि. सांगली हा जुळेवाडी ते रेठरे बु. असले कमानीजवळ येताच त्यास ताब्यात घेतले.
सदरचा तडीपार इसम यास हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक, सातारा यांनी त्यांचेकडील आदेश क्र. स्थागुशा. 06/22 म.पो.का.क.55/3297/2022 सातारा दिनांक 26.12.2022 अन्वये सातारा तसेच सांगली जिल्हयातील वाळवा, शिराळा व कडेगांव तालुका हद्दीतून 2 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले असुन सुध्दा तो हद्दपार आदेशाचा उल्लंघन करुन फिरताना मिळुन आल्याने तडीपार आदेशाचा भंग केला म्हणुन त्याचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस ठाणे डी.बी पथकातील पो.हवा. नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे यांनी केली. सदर दाखल गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा. नितीन येळवे हे करीत आहे.
राजू सनदी कराड

Comments
Post a Comment