ऊसतोड सुरू असताना बिबट्याची नवजात बछडी सापडली....


ऊसतोड सुरू असताना बिबट्याची नवजात बछडी सापडली....

कराड दि.19-हिंगनोळे ता.कराड येथील शेतकरी सौ विद्या निवासराव माने यांच्या शेतात उसतोड सुरू असताना दुपारी बिबट्याची दोन पिल्ले सरीत सापडली. वनविभागाने सायंकाळी त्या पिल्लांची व आईची भेट घडवून आणली.

बिबट्याची पिल्ली सापडली असल्याची माहिती वनपाल सागर कुंभार यांना समजताच तातडीने घटनस्थळी जाऊन पिल्ले ताब्यात घेतली. सदर बिबट्याची पिल्लं ही नवजात होती व अजून डोळे उघडायची होती. मादी बिबट्या ही जवळपासच असणार हे ओळखून वाईल्ड लाईफ रेस्कूअर्स कराड च्या टीमला पाचारण करून मादी व पिल्लू यांचे पुनर्मिलन घडवून आणण्याचा निर्णय परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले यांनी घेतला.

संध्याकाळी 5.30 वाजता विशिष्ट व्यवस्था करून दोन्ही पिल्ले क्रेट मध्ये सापडलेल्या ठिकाणी कॅमेरे लाऊन पुन्हा ठेवण्यात आले. मादी बिबट्या संध्याकाळी 7.30 वाजता येऊन आपल्या एक पिल्लू अलगदपणे घेऊन गेली. सदर पहिले पिल्लू सुरक्षित ठिकाणी ठेवून पुन्हा दुसऱ्या पिल्लूसाठी मादी बिबट्या 8.20 वाजता आली व दुसरे पिल्लू ही सुरक्षित घेऊन गेली.

वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनक्षेत्रपाल परिविक्षाधीन सुजाता विरकर, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे सह सदर कारवाई मध्ये वनपाल सागर कुंभार , वनरक्षक सचिन खंडागळे, मेजर अरविंद जाधव, वनसेवक शंभूराज माने यांनी सहभाग घेतला. तर वाईल्ड लाईफ रेस्कूअर्स कराडचे अजय महाडीक, गणेश काळे, रोहित कुलकर्णी, रोहित पवार, अनिल कोळी, सचिन मोहिते यांनी मोलाची भूमिका पार पाडली .

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक