लोकसभेची आचारसंहिता लागल्याने कराडातले फलक काढले...

 


लोकसभेची आचारसंहिता लागल्याने कराडातले फलक काढले...

कराड दि.16 (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाने आज मतदानाच्या तारखा घोषित केल्याने आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे कराड शहरात ठीक ठिकाणी लागलेले राजकीय फ्लेक्स बॅनर फलक कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढले. तसेच राजकीय संघटना व पक्षांचे बोर्ड झाकून टाकण्यात आले आहेत.

लोकसभेचा निवडणूक कार्यक्रमास घोषित झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे कराड शहरात ठिकठिकाणीच्या चौकात विविध राजकीय पक्षांचे, नेत्यांचे फ्लेक्स, विविध कार्यक्रमानिमित्त सणानिमित्त विविध पक्षांच्याकडून देण्यात येणाऱ्या शुभेच्छा फलक कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढण्यास सुरुवात केली आहे तसेच शहरात अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्ष, संघटना आदींचे फलक झाकण्यात येत आहेत.

आज निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होणार असल्याने महसूल तसेच नगरपरिषदेच्या वतीने विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तहसीलदार विजय पवार यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श आचारसंहिता संदर्भात मार्गदर्शन व सूचना करण्यात आल्या या सूचनेनुसार नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अभियंता आर डी भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, वरिष्ठ मुकादम मारुती काटरे यांनी आपल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील प्रत्येक प्रभागात तसेच प्रत्येक चौकात पाहणी करून आचारसंहितेच्या अनुषंगाने विविध ठिकाणी असणारे राजकीय पक्षाचे, संघटनेचे फ्लेक्स, बॅनर काढून व विविध ठिकाणी पक्षाचे, संघटनेचे असणारे फलक झाकून अन्य ठिकाणी असणाऱ्या इतर फ्लेक्स व बॅनर बाबत संबंधितांना ते काढून घेण्याबाबत सूचना केल्या 

राजू सनदी कराड 



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक