आ.पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे प्रयत्नातून आटके येथे मंजूर झालेल्या ५ कोटी ३० लाखांच्या विकास कामांचे उदघाटन व भूमीपुजन संपन्न...
आ.पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे प्रयत्नातून आटके येथे मंजूर झालेल्या ५ कोटी ३० लाखांच्या विकास कामांचे उदघाटन व भूमीपुजन संपन्न...
कराड दि.10-कराड दक्षिण मतदार संघातील आटके, ता. कराड येथील पाचवड वस्ती ते बाराबिगा रेठरे बुद्रुककडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस उदयसिंह पाटील (दादा) व पवार वस्ती ते पीरापर्यंत जाणा-या रस्त्याचे भूमीपुजन कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजीत चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यखतेखाली आटके गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रोहिणी पाटील ह्या उपस्थित होत्या.
त्यावेळ उदयसिंह पाटील (दादा) यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आ.पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे माध्यमातून विविध विकास कामांना निधी उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे आटके गावामध्ये ५ कोटी ३० लक्ष एवढा भरघोस निधी उपलब्ध करुन दिला असून या गावाने नेहमीच काँग्रेसच्या विचार धारेला साथ दिलेली आहे. त्यामुळे देशात व राज्यात या मतदार संघाची वेगळी ओळख आहे. यापुढेही आपले गाव काँग्रेसच्या विचाराच्या पाठीशी ठाम उभे राहील.
मनोहर शिंदे म्हणाले आटके गावाला साप्रदायिक व सामाजिक परंपरा असून आटके गावातील सर्वसामान्य जनता कायम काँग्रेसच्या पाठीशी राहिलेली आहे. विकास हि अखंड चालणारी प्रक्रिया असून, त्यासाठी सर्वांनी साथ दिली पाहिजे. आटके येथील स्थानिक शेतकरी व युवक यांचेशी झालेल्या चर्चेनुसार सदरचा रस्ता दळण-वळण व शाळेचे विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांचा शेत माल व ऊस वाहतुक करणेसाठी महत्वाचा असलेने बाबांनी महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये प्रस्तावित करुन मंजूर केलेला आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी पाचवडेश्वर- कोडोली व रेठरे पुल मंजुर करुन दळण-वळण व कृष्णा कारखान्याच्या ऊस वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न मार्गी लावला आहे. यापुढेही आटके गावच्या विकास कामासाठी बाबाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देणेचे आश्वासन दिले.
धनाजी काटकर (सर) यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये आजपर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून स्वं. यशवंतराव मोहिते (भाऊ), स्वं. विलासराव पाटील (उंडाळकर) व विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) या तीनच लोकप्रतिनिधींना निवडूण दिले आहे. त्यामुळे कराड दक्षिण मतदार संघातील जनता ही काँग्रेसच्या पाठीशी आहे हे स्पष्ट होते.
सदर कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित उपसरपंच डॉ. बी. जी. काळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजित चव्हाण उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच सुरेश पाटील, माणिकराव पाटील, जालिंदर पाटील, प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रतिक्षा पाटील, सौ.शोभा दुपटे व विजय पाटील, आर. आर. पाटील (सर), उत्तमराव काळे, संजय जाधव, राजेंद्र पाटील, शिवाजीराव पाटील, पोपटराव पाटील, प्रशांत पाटील, चंद्रकांत जाधव, बाळासो पाटील, ग्रामपंचायत सदस्य, युवक, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावना अजित पाटील यांनी केले व आभार तानाजी पाटील यांनी मानले.

Comments
Post a Comment