म्होप्रे येथे जमिनीच्या वादातुन खुन करुन पळून गेलेल्या 4 आरोपींना अटक...खुनाचा गुन्हा 2 तासात केला उघड...
म्होप्रे येथे जमिनीच्या वादातुन खुन करुन पळून गेलेल्या 4 आरोपींना अटक...खुनाचा गुन्हा 2 तासात केला उघड...
कराड दि.- म्होप्रे ता. कराड येथे जमिनीच्या वादातून काल सायंकाळी एकाचा खून करण्यात आला होता. या खुनाचा तपास जलद गतीने करून कराड तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या खून प्रकरणी कराड शहर व परिसरातून 4 जणांना अटक केली आहे.
दिलीप संकपाळ हे म्होप्रे ता. कराड गावात त्यांचे घराचे पाठीमागे पत्र्याचे शेडचे काम करीत होते. त्यांचा व त्यांचे भाऊ रमेश संकपाळ यांचा जमिन व जागा वाटपावरुन वाद चालू होता. शेडचे काम चालू असताना रमेश संकपाळ यांची मुले अनिल संकपाळ व सुनिल संकपाळ हे तेथे गेले. त्यांनी शेडचे कामास विरोध करुन काम बंद पाडले. त्याठिकाणी अनिल व सुनिल यांनी दिलीप संकपाळ यांची मुले किरण व किशोर यांचेशी वाद चालु केला. वाद चालु असताना दिलीप संकपाळ यांनी गावातील प्रकाश बाबुराव पाटील यांना मध्यस्थी करण्यासाठी बोलाविले परंतु अनिल व सुनिल त्यांचेदेखील काहीही ऐकत नसल्याने ते निघुन गेले. त्यानंतर अनिल व सुनिल यांनी फोन करुन त्यांचा नातेवाईक रणजित जाधव रा- गोळेश्वर यास तेथे बोलाविले. रणजित जाधव हा त्याचे चारचाकी वाहनातुन सोबत सुरज सावंत याला घेऊन गेला. तेथे - अनिल व सुनिल यांनी त्यांस भडकविले. रणजित जाधव याने किरण संकपाळ व किशोर संकपाळ यांचेवर चाकूने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. सुरज सावंत याने दिलीप संकपाळ यांना मारहाण केली, त्यानंतर रणजित जाधव व इतर सर्वजण यांनी मध्यस्व प्रकाश पाटील हे दिलीप संकपाळ यांची बाजू घेत असल्याचा संशय घेऊन त्यांनी शोधण्यासाठी गेले. बसस्टॉप जवळ मध्यस्थ प्रकाश बाबुराव पाटील हे त्यांचे स्कॉर्पीओ गाडीमध्ये बसले असताना त्यांचेवर रणजित जाधव याने चाकुने हल्ला करुन गंभीर जखमी करुन त्यांना ठार केले. चारही आरोपी तेथुन पळून गेले.
दिलीप किसन संकपाळ यांचे तक्रारीवर कराड तालुका पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असलेने पोलीस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे कराड तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि अभिजीत चौधरी, अर्चना शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी, पो.हवा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे तसेच पो.हवा. समीर कदम, गणेश वेदपाठक, नितीन कुचेकर, जयसिंग राजगे, राजेश सारुक, मोहित गुरव यांची वेगवेगळी पथके तयार करुन म्होप्रे तसेच त्याचे नातेवाईकाकडे आरोपीचा शोध घेवुन गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार नितीन येळवे,, सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे यांनी 2 आरोपी मलकापुर ता. कराड व 2 आरोपी शिवाजी स्टेडीयम कराड येथून ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेवून कसुन चोकशी केली असतात्यांनी सदरचा गुन्हा केलेचे कबुल केले.
ताब्यात घेतले आरोपींची नावे- 1. रणजित माणिकराव जाधव वय. 31 वर्ष रा. गोळेश्वर ता. कराड, 2. अनिल रमेश संकपाळ वय. 30 वर्ष 3. सुनिल रमेश संकपाळ वय. 24 वर्ष दोन्ही रा. म्होप्रे ता. कराड 4. सुरज निवास सांवत वय. 22 वर्ष रा. सुर्यवशी मळा, कराड अशी असुन त्यांनी चाकूने वार करुन खुन केलेचे कबुल केले आहे. सर्व आरोपींना अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोठनि सचिन भिलारी हे करीत आहेत.
वरील कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर व कराड तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि अभिजीत चौधरी, अर्चना शिंदे पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार नितीन येळवे,, सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे तसेच पो.हवा. समीर कदम, गणेश वेदपाठक, नितीन कुचेकर, जयसिंग राजगे, राजेश सारुक मोहित गुरव यांनी सदरचे आरोपी यांना 2 तासाचे अटक करुन गुन्हा उघडकीस आणुन चांगली कामगीरी केली आहे.

Comments
Post a Comment