सैदापुरात सुनेला पळवून नेल्याच्या कारणावरून तिघांवर खुनी हल्ला; हल्ल्यात एकाचा मृत्यू...
सैदापुरात सुनेला पळवून नेल्याच्या कारणावरून तिघांवर खुनी हल्ला; हल्ल्यात एकाचा मृत्यू...
कराड दि.14- सैदापुर ता. कराड येथे काल रात्री सुनेला पळवून नेल्याच्या कारणावरून ऊसतोड करणाऱ्या मदने कुटुंबातील तिघांवर खुनी हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात एकाचा मृत्यू मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी शेनोली येथील एकास तात्काळ अटक केली आहे. विजय धर्मा जाधव (वय-55) वर्षे मुळ रा. शेणोली स्टेशन गोपाळवस्ती ता. कराड (सध्या सुरेश सांळखे गु-हाळावरील कामगार) असे या कुणी हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यात बाबा आळवंत मदने (वय-50) यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री कराड शहर पोलीस ठाणेचे हद्दीत सैदापूर येथील अंबक वस्ती येथील संतोष देसाई यांचे गुराळातील ऊस तोडीच्या कामावर असलेले बाबा आळवंत मदने वय-50 वर्षे, मुळ रा. तडवळे बहुज ता. खटाव यांचे झोपडीमध्ये विजय धर्मा जाधव (वय-55) वर्षे मुळ रा. शेणोली स्टेशन गोपाळवस्ती ता. कराड (सध्या सुरेश सांळखे गु-हाळावरील कामगार) याने त्याची विवाहीत सुन सपना हि बाबा मदने यांचा मुलगा अक्षय मदने यांने पळवून नेहल्याचा राग मनात धरून त्याच कारणावरून विजय जाधव हा मदने कुंटुबियाचे झोपडीजवळ येऊन शिवीगाळ धमकी देत त्याने अचानक चाकुने बाबा मदने यांच्यावर चाकूने हल्ला चालू केला असता त्यांची पत्नी इंदू व मुलगा अजित मदने भांडणे सोडवणेकरीता आल्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर बाबा मदने यांचे छातीवर वार करून चाकु छातीमध्ये भोकसून त्यांना जीवे ठार मारून खुन केला.
सदर खुनाची घटनेबाबत कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना माहिती प्राप्त होताच घटनास्थळी कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखा व पोलीस स्टाफ तात्काळ पोहचून खुन करून तेथून पसार झालेला आरोपी - विजय धर्मा जाधव वय-55 वर्षे मुळ रा. शेणोली स्टेशन गोपाळवस्ती ता. कराड याचा शोध घेवून खुनाच्या गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती वंदना श्रीसुंदर, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि पतंग पाटील, पोउनि अझरूददीन शेख, पोउनि मारूती चव्हाण, सफौ रघुवीर देसाई, सफो विवेक गोवारकर, पोलीस हवा. प्रविण काटवटे, शशिकांत काळे, अमित पवार, राजेंद्र देशमुख पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, वसीम संदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, सावन परदेशी, स्वप्नील पाटील यांनी केलेली आहे.
राजू सनदी कराड

Comments
Post a Comment