यशस्वी होण्यासाठी युवकांनी वैचारीक व आकलन क्षमता वाढविणे आवश्यक : डॉ. राधाकृष्णन पिल्लई...


यशस्वी होण्यासाठी युवकांनी वैचारीक व आकलन क्षमता वाढविणे आवश्यक : डॉ. राधाकृष्णन पिल्लई...

कराड दि.11-युवकांनी यशस्वी होण्यासाठी जे दिसत त्या पलिकडचे पहायला आणि जे ऐकू येते त्या मागचे ऐकायला शिकले पाहिजे. यासाठी वैचारिक क्षमता वाढविली पाहिजे. विचार करण्यासाठी अनुभवाची गरज नसते तर स्वतःची आकलन शक्ती वाढविण्याची गरज असते. आणि यामुळेच जीवनात यशस्वी होण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींमधील योग्य पर्याय निवडणे सुलभ होत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रशिक्षक व वैयक्तिक मार्गदर्शक डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी केले.

दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराडच्यावतीने सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सातारा शहरातील पहिल्या व बँकेच्या १३ व्या उद्योजकता विकास शिबिराचे आयोजन केले होते. याशिबिरास प्रमुख वक्ते प्रसिद्ध व्याख्याते, प्रशिक्षक व वैयक्तिक मार्गदर्शक डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी विद्याथ्यांना 'युवकांना यशस्वी जीवनासाठी चाणक्य नीति' या विषयावर केले.

डॉ. पिल्लई पुढे म्हणाले की, परिस्थिती कशीही असली तरी मनस्थिती ही योग्यच असली पाहिजे. व्यवसाय वाढविण्यासाठी फक्त ज्ञान असून चालत नाही तर त्याबरोबरच अनुभवाची देखील आवश्यकता असते. यासाठी स्वतः योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे आणि इतरांना सुद्धा योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. युवकांनी स्वतःतील नेतृत्व गुण स्वतःच ओळखले पाहिजेत. त्याचबरोबर युवकांनी आर्य चाणक्य यांनी यशस्वी होण्यासाठी सांगितलेल्या एकूण ३६ गुणांपैकी अन्विक्षिकी, वृद्धसंयोगः व मित्र संबंधः या ३ गुणांचे आकलन वैयक्तीक जीवनात करणे आवश्यक असल्याचे डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी सांगितले.

डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी विविध उदाहरणे दाखले देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी मित्र आणि समाजाची साथ असणे आवश्यक असते; यामुळे जेव्हा आपण स्वतः यशस्वी होतो तेव्हा आपल्यासोबत असणाऱ्यांना सुद्धा यशस्वी होण्यासाठी मदत करण्याचा सल्ला डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी दिला.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी स्वागत, प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांची ओळख करून देत असताना, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरू आर्य चाणक्य यांच्या विषयी आवड असणारे प्रभावी वक्ते, उत्तम मार्गदर्शक व अनेक उद्योजक निर्माण करणारे डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांच्या शैक्षणीक तसेच विविध ठिकाणी केलेल्या कार्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे बँक राबवित असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच सन २०११ पासून कराड येथे सुरू केलेल्या उद्योजकता विकास शिबिर या सामाजिक उपक्रमाचा फायदा सातारा येथील युवकांना व्हावा आणि त्यांचे भविष्य उज्वल व्हावे आणि पर्यायाने बँकेस भविष्य काळात चांगला ग्राहक मिळावा या उद्देशाने कराड अर्बन बँकेने यावर्षी पासून सातारा शहरात सदर शिबिराचे आयोजन केले आहे. बँक नेहमीच युवा उद्योकांना अर्थसाक्षर करून अर्थसहाय्य करत असते. उपस्थित युवकांनी सुद्धा स्वतःचे व्यवसाय सुरू करावेत यासाठी कराड अर्बन बँक आपणास नक्कीच सहकार्य करेल असे आवाहन करत सीए. दिलीप गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

याप्रसंगी डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांचा बँकेच्यावतीने माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी व मुख्य कार्यकारी सीए. दिलीप गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, सातारा शहरातील सन्माननीय नागरीक, सातारा परीसरातील सुमारे १२०० ते १४०० महाविद्यालयीन विध्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बँकेच्या विधी अधिकारी स्नेहांकीता नलबडे यांनी तर आभार उपमहाव्यवस्थापक विजय काकडे यांनी व्यक्त केले.

कराड अर्बन बँकेच्या पोवई नाका सातारा शाखेद्वारे स्टँप फ्रँकींग सेवेचा शुभारंभ....

दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराडच्या पोवई नाका सातारा शाखेत फ्रैंकींग सेवेचा शुभारंभ बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, तसेच संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व बँकेचे वरिष्ठ अधिकारी, सेवक व ग्राहक उपस्थित होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक