शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड आणि माय कन्सोल यांच्यात सामंजस्य करार...

 


शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड आणि माय कन्सोल यांच्यात सामंजस्य करार...

कराड दि.31-:- येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने पर्यावरणीय शाश्वतता वाढीस लावणे तसेच हरित उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने लंडन युनायटेड किंगडम येथील पर्यावरण, सामाजिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातील कंपनी माय कन्सोल यांचे सोबत नुकताच सामंजस्य करार केला.

महाविद्यालयाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर भालसिंग यांचे धोरण नेहमीच पर्यावरण पुरक असुन त्यांचेकडुन संस्थेला पर्यावरणाच्या जागरूकतेबाबत वेगवेगळ्या माध्यमांतून वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सामंजस्य कराराबाबत अधिक माहिती देताना मोरेश्वर भालसिंग म्हणाले की

"शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात भरीव वाढ व जागरूकता वाढवणे तसेच पर्यावरण पूरक महाविद्यालयीन आवर तयार करणे, पर्यावरण पूरक घटकांचा अभ्यासक्रमात सहभाग करणे, उद्योगाकरिता केस स्टडीज विकसित करणे ह्या काही प्राथमिक उद्दिष्टांचा सामंजस्य करारात समावेश आहे." 

याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कंपनीचे संचालक निरंजन वाघमारे म्हणाले " आम्ही या संस्थेस आमचे योगदान देण्यास व सकारात्मक बदल घडवून आणण्यास अतिशय उत्सुक आहोत. आमची कंपनी व महाविद्यालय यांच्या भागीदारीतून आम्ही शाश्वत व सर्वसमावेशक भविष्याकडे प्रगतीचे एक पाऊल टाकले आहे तसेच शैक्षणिक व औद्योगिक विकासात नवीन मापदंड प्रस्थापित करण्यासाठी आम्ही तयार आहोत, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांसाठी आम्ही अधिक हरित व शाश्वत भविष्याचा मार्ग मोकळा करून देऊ." सदर सामंजस्य कराराच्या माध्यमातून दोन्ही संस्था पर्यावरण पूरक महाविद्यालयीन क्षेत्र विकसित करणे, तसेच हरित उपक्रमांना चालना देऊन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढीस लावणे, विद्यार्थ्यांच्या चालू अभ्यासक्रमात पर्यावरण पूरक घटकांचा समावेश करून त्यांना त्यांच्या क्षेत्रातील पर्यावरण निगडित आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करणे तसेच विद्यार्थ्यांना कराड व पुणे येथील औद्योगिक क्षेत्रांसोबत जोडून व्यवहारिक समस्यांवर अभ्यास करायला लावणे व त्यातून उद्योगांना पर्यावरण पूरक कार्यशैली अंगीकारण्यासाठी चालना देणे ह्याबद्दल कटीबद्ध आहेत.

यावेळी संस्थेचे विद्यमान प्राचार्य प्रा. विनायक कुलकर्णी यांनी श्री. मोरेश्वर भालसिंग व निरंजन वाघमारे यांचे आभार मानले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक