सातारा जिल्हा पोलिस प्रमुखांचा सराईत गून्हेगार अभिनंदन झेंडेला दणका......
कराडचा सराईत गून्हेगार अभिनंदन झेंडे वर्षभरासाठी स्थानबध्द... कराड दि.28 (प्रतिनिधी) कराडचा सराईत गून्हेगार अभिनंदन झेंडे याच्यावर एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) नूसार कारवाई करीत त्यास एक वर्षासाठी स्थानबध्द करुन जिल्हा पोलिस प्रमुख समिर शेख व कराडचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी आर पाटील यांनी झेंडेला दणका दिला आहे.विविध गून्हे दाखल असलेल्या झेंडेने पोलिसांना जेरीस आणले होते.तडीपार हद्दपार करुन ही झेंडे सूधरत नसल्याने त्याच्या विरोधात एमपीडीए अॅक्ट नूसार कारवाई करण्याबाबत पो.नि पाटील यांनी एसपींकडे प्रस्ताव सादर केला होता. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अभिनंदन रतन झेंडे (वय 35) रा. शाहू चौक कराड हा खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, सरकारी नोकरास मारहाण करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी असे गुन्हे सातत्याने करीत होता. त्यास सातारा जिल्हयातून तडीपार करुन देखील त्यास गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करणे अशक्यप्राय ...