ग्रामीण महिला नवउद्योजकांची अनोखी कराडची जत्रा;महिला बचत गटाच्या उत्पादित मालाचा खरेदी महोत्सव...

 


ग्रामीण महिला नवउद्योजकांची अनोखी कराडची जत्रा;महिला बचत गटाच्या उत्पादित मालाचा खरेदी महोत्सव...

कराड, दि.25: कराड तालुक्यातील ग्रामीण भागामधील उमेद अभियान अंतर्गत असलेल्या बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवण्याच्या अनुषंगाने व प्रोत्साहन देण्यासाठी नाविण्यपूर्ण अशा कराडच्या जत्रेचे आयोजन दि.28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी करण्यात आले आहे. कराड येथील बैल बाजार मैदान, शेती उत्पन्न बाजार समिती येथे उमेद- तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, कराड पंचायत समिती व ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था ओंड यांच्या वतीने या कराडच्या जत्रेत 100 स्टॉल मधून घरगुती व दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी कराडकरांना उपलब्ध होणार असल्याची माहिती कराड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी दिली.

ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्रीची खात्रीशीर बाजारपेठ मिळवून देण्याच्या प्रामाणिक हेतूने उमेद तालुका अभियान कक्ष पंचायत समिती कराड व ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रकल्प संचालक चंचल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि.28 फेब्रुवारी ते बुधवार दि.1 मार्च 2023 रोजी कराड येथील बैल बाजार मैदान, कराड शेती उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित कराडच्या जत्रेत 100 हून अधिक महिला बचत गटांच्या उत्पादनांचे विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकसहभागातून होत असलेल्या कराडच्या जत्रेत महिला बचत गटांना निशुल्क मोफत स्टॉल देण्यात आले आहेत.पूढे वाचा...

या दोन दिवशी 100 हून अधिक महिला बचत गटांच्या स्टॉलमध्ये हातसडीचा तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, चिक्की, विविध मसाले, शुगर फ्री बिस्किटे, सेंद्रिय हळद, लाकडी खेळणी, सेंद्रिय गुळ व काकवी, गांडूळ खत, स्ट्रॉबेरी, कुरडई, भातवडी, सांडगे आदीसह उन्हाळी पदार्थ, पापड, विविध लोणची, गारमेंट, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ (कडधान्य विविध प्रकारचे), इमिटेशन ज्वेलरी, विविध प्रकारच्या चटण्या, आवळा कॅन्डी, शाकाहारी जेवण, थालीपीठ, गुळपोळी बरोबरच बिर्याणीचे स्टॉल, गोधडी, पिलो कव्हर, क्रॉफ्ट बॅग्स, मातीची भांडी, ड्रेस, चप्पल, स्वीट कॉर्नर, ड्रेस, बेकरी प्रॉडक्ट आदी स्टॉल सहभाग होणार आहेत.

या ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन व चालना देण्यासाठी होत असलेल्या कराडच्या जत्रेला सर्वांनी सदिच्छा भेट देऊन नवउद्योजक महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पूढे वाचा...

उमेद अभियान अंतर्गत सुरू असलेल्या महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित मालाचे विक्री प्रदर्शन महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस यात्रा आणि पुणे विभागीय स्तरावर भीमथडी यात्रेच्या माध्यमातून होत असते. तसेच सातारा जिल्हा स्तरावर मानिनी यात्रा होत असते. राज्यात पहिल्यांदाच तालुकास्तरावर महिला बचत गटाच्या उत्पादित मालाचे विक्री प्रदर्शन कराडच्या जत्रेच्या निमित्ताने होत आहे. विशेषतः लोकसहभागातून होणारा हा नाविण्यपूर्ण उपक्रम महिला बचत गटांना पाठबळ देणारा आणि ग्राहकांना खात्रीशीर व दर्जेदार घरगुती मालाचे उत्पादन खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक