सह्याद्री कारखान्याजवळ पाऊण कोटीचा गूटखा पकडला;दोघे ताब्यात तर सव्वा कोटीचा मूद्देमाल जप्त...
सह्याद्री कारखान्याजवळ पाऊण कोटीचा गूटखा पकडला; मुद्देमालासह दोघे ताब्यात...
कराड दि.21 (प्रतिनिधी) यशवंतनगर ता. कराड येथे सह्याद्री सहकारी साखर कारखाना नजीक असणाऱ्या विठ्ठल मंदिरासमोर काल मध्यरात्री तळबीड पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारा आयशर कंटेनरसह 83 लाख 9 हजार 296 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून तळबीड पोलिसात याबाबतचा गून्हा दाखल झाला आहे.याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे हे करीत आहेत.
याबाबत तळबीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल मध्यरात्री कराड-मसूर रस्त्याने कर्नाटक मधून बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक एका आयशर कंटेनर मधून होणार असल्याची माहिती तळबीड पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे व तळबीड पोलीस स्टेशनचे पोलीस फौजदार गोपीचंद बाकले, पो.हवा. आप्पा ओंबाशे, पो हवा. शहाजी पाटील, पो कॉन्स्टेबल निलेश विभुते, महेश शिंदे यांनी मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री यशवंतनगर येथील विठ्ठल मंदिरासमोर सापळा रचून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आयशर कंटेनर गुटख्यासह ताब्यात घेतला... पूढे वाचा...
आयशर ट्रक क्रमांक के ए 32-एए 3770 यामध्ये असणारा 83 लाख 9 हजार 296 रुपये किमतीचा 5 हजार 744 किलो वजनाचा महाराष्ट्र प्रतिबंधित असलेला गुटखा व त्याची वाहतूक करीत असणारा टकंटेनर असा एकूण 1 कोटी 13 लाख 9 हजार 296 रुपयांचा माल जप्त करून महंमद ताजुद्दीन सैफुनसाब बालवाले रा. नरोना ता. आलम जि. गुलबर्गा व महबूब बाबुमिया रा. उडबल ता. हुमनाबाद जि. बिदर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.



Comments
Post a Comment