कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर येणार सिनेमा...
कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर येणार सिनेमा...
कराड दि.22-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कोल्हापुरातील कुस्तीच्या मैदानातून पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय नागराज मंजुळे यांनी घेतला आहे.
कुस्तीच्या मैदानातून घोषणा....
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. याच कुस्तीच्या मैदानातून नागराज मंजुळे यांनी ही मोठी घोषणा केली आहे...पूढे वाचा...
नागराज मंजुळे म्हणाले "खाशाबा जाधव हे जागतिक किर्तीचे आणि दर्जाचे पैलवान होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच मी यासंदर्भात माहिती देईन. या सिनेमाचं शूटिंग देखील कोल्हापुरात होऊ शकतं. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तो काळ अनुभवायला मिळणार आहे". आता या सिनेमाची चाहत्यांना आणि कुस्तीप्रेमींना उत्सुकता आहे.(स्व.खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजीत जाधव यांच्या फेसबूकवरुन साभार)



Comments
Post a Comment