...अखेर महामार्गावरील तो बोगदा जमीनदोस्त;नवीन पूल उभारणीचा लवकरच शूभारंभ...
कोल्हापूर नाका-जाधव आर्केड नजीकचा बोगदा अखेर जमीनदोस्त;नवीन पूल उभारणीचा लवकरच शूभारंभ...
कराड दि.27 (प्रतिनिधी) महामार्गावरील कोल्हापूर नाका येथिल जाधव आर्केड नजीकचा बोगदा अखेर आज जमीनदोस्त करण्यात आला.तत्पूर्वी बोगद्यापासून हाॅटेल पंकज दरम्यानचा पूलाचा संपूर्ण भराव काढण्यात आला असून या ठिकाणी नवीन पूलाच्या पहिल्या पिलरच्या उभारणीचा लवकरच शूभारंभ करण्यात येणार आहे.या ठिकाणापासून ते लोटस फर्निचर दरम्यान 3.4 कि.मी.चा सिंगल पिलवरील सहा लेनचा नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.पूढे वाचा...
2005 साली हा बोगदा वाहतुकीला खूला करण्यात आला होता.गर्दीच्या वेळी शाहू चौकातून दैत्य निवारणी,रणजित टाॅवर,पंकज लाॅन पासून महामार्गावर जाण्यासाठी हा बोगदा उपयोगी पडत होता.कालांतराने महामार्गावरील वाहतूक वाढल्यानंतर या बोगद्यातील मार्ग अडचणीचा ठरू लागला होता.परिणामी अपघात घडू लागल्याने रस्ते विकास महामंडळ व वाहतुक पोलिस प्रशासनाने तो बोगदा बंद करण्यावर विचार विनिमय केला.त्यानंतर या बोगद्याच्या दोन्ही बाजूला बहिर्वक्र मिरर बसवण्यात आले.मात्र याचा ही फारसा उपयोग झाला नाही.ऊलट वाहनचालक चूकीच्या दिशेने येऊन या बोगद्यातून प्रवास करू लागल्याने अपघातामध्ये वाढ झाल्याने प्रशासनाने बोगदा बंद करण्याचा निर्णय घेतला मात्र त्याची अमलबजावणी झाली नाही.पूढे वाचा...
अखेर सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्याने कोल्हापूर नाक्यावरील हा अठरा वर्षांपूर्वीचा उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय झाल्याने सात फेब्रुवारी पासून पाडकाम सुरू करण्यात आले. सध्या या संपूर्ण पुलाचा निम्म्यापेक्षा अधिक भाग पाडण्यात आला असून उर्वरित भाग पाडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाडकाम पूर्ण झाल्यानंतर डाव्याबाजूचे बॅरीगेटस काही प्रमाणात आत लावले जातील व सातारा बाजू कडून कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक डाव्या बाजूने वळवण्यात येणार आहे.
कराड टुडे आॅनलाईन न्यूज पोर्टल व कराड टुडे न्यूज चॅनेलसाठी बातम्या व जाहिरातींसाठी सपंर्क-राजू सनदी,कराड
9822308552,9823141970 rajusanadi@gmail.com


Comments
Post a Comment