सातारा जिल्हा पोलिस प्रमुखांचा सराईत गून्हेगार अभिनंदन झेंडेला दणका......
कराडचा सराईत गून्हेगार अभिनंदन झेंडे वर्षभरासाठी स्थानबध्द...
कराड दि.28 (प्रतिनिधी) कराडचा सराईत गून्हेगार अभिनंदन झेंडे याच्यावर एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) नूसार कारवाई करीत त्यास एक वर्षासाठी स्थानबध्द करुन जिल्हा पोलिस प्रमुख समिर शेख व कराडचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी आर पाटील यांनी झेंडेला दणका दिला आहे.विविध गून्हे दाखल असलेल्या झेंडेने पोलिसांना जेरीस आणले होते.तडीपार हद्दपार करुन ही झेंडे सूधरत नसल्याने त्याच्या विरोधात एमपीडीए अॅक्ट नूसार कारवाई करण्याबाबत पो.नि पाटील यांनी एसपींकडे प्रस्ताव सादर केला होता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अभिनंदन रतन झेंडे (वय 35) रा. शाहू चौक कराड हा खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, सरकारी नोकरास मारहाण करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी असे गुन्हे सातत्याने करीत होता. त्यास सातारा जिल्हयातून तडीपार करुन देखील त्यास गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करणे अशक्यप्राय झालेले होते. त्याचे वागणुकीमुळे सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखणे अवघड झाले होते. याकारणास्तव बी. आर. पाटील वरीष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर यांनी पोलीस अधिक्षक, सातारा यांचे मार्फतीने जिल्हादंडाधिकारी, सातारा यांचेकडे एम.पी.डी.ए. कायद्या अंर्तगत प्रस्ताव पाठवला होता. सातारा जिल्हादंडाधिकारी यांनी त्याचे सखोल अवलोकन, शहानिशा व खातरजमा करून अभिनंदन रतन झेंडे यास एक वर्षाकरीता स्थानबध्द केलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी उचललेले पाऊल हे वैशिष्ठ पुर्ण म्हणावे लागेल. सातारा जिल्ह्यातील वर्षातील ही पहिलीच कारवाई आहे. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत कार्यरत असणान्या टोळ्या कराड तालुका व जिल्ह्यातून हद्दपार होत असल्यातरी त्याच्या छुप्या हालचालींचा बीमोड करण्यास या स्थानबद्धतेमुळे "एक पाऊल पुढे" या उक्तीची प्रचिती करुन दिली आहे. सदरक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने सार्थ होत आहे.
गुन्हेगारांचा गुन्हेगारी अभिलेख व त्यांच्या गुप्त हालचालीवर ठेवण्यात येणारे लक्ष आणि कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारी टोळक्यांचे मुळावर कायदेशीर घाव घालून केलेली स्थानबद्धता ही या कारवाईची वैशिष्ठे मानावी लागतील. अशा कारवाईमुळे समाजामध्ये निर्माण झालेली असुरक्षीतता बदलून कायद्याचे पालन करणान्या नागरीकांसाठी सातारा जिल्हा पोलीस दलाकडून सुरक्षेची हमी देण्यात सातारा पोलीस दल यशस्वी होत आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस हवालदार नितीन येळवे, प्रफुल्ल गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाणेचा चार्ज घेतल्यापासून 61 गुन्हेगारानां तडीपार केल आहे. त्यांच्या हालचालीवर पोलीसांचे लक्ष असुन गुन्हेगारी पासून परावृत्त न झाल्यास त्यांना ही MPDA कायद्यान्वये कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
Comments
Post a Comment