कराड नगरपरिषदेचे दरवाढ नसलेले 366 कोटींचे बजेट मंजूर...
कराड नगरपरिषदेचे दरवाढ नसलेले 366 कोटींचे बजेट मंजूर...
कराड दि.28 (प्रतिनिधी) कराड नगर परिषदेचा सन 2023-24 चा दरवाढ नसलेला 366 कोटींचे अंदाजपत्रक प्रशासकीय बैठकीत मंजूर झाल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारि रमाकांत डाके यांनी प्रसिद्धी पत्रिका द्वारे दिली आहे. सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प (बजेट) तयार झालेले असून एकूण 366 कोटी 7 लाख रुपयांचा कोणतीही दरवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असून यामध्ये विविध विभागांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत.
या बजेटमध्ये अपेक्षित महसुली जमा 106 कोटी 71 लाख 25 हजार 45 इतकी दाखवण्यात आली आहे. यामध्ये सन 2022- 23 ची अखेरची व सन 2023-24 ची आरंभीची शिल्लक 10 लाख 94 हजार 837 अशी एकूण महसुली जमा 106 कोटी 82 लाख 19 हजार 882 दर्शवण्यात आली आहे.
या बजेटमध्ये अपेक्षित भांडवली जमा 232 कोटी 38 लाख 27 हजार 667 इतकी दाखवण्यात आली आहे. यामध्ये सन 22-23 ची अखेरची व सन 23-24 ची आरंभीची शिल्लक 26 कोटी 87 लाख 48 हजार 576 अशी एकूण भांडवली जमा 259 कोटी 25 लाख 76 हजार 243 दर्शविण्यात आली आहे.
बजेटमध्ये अपेक्षित महसुली खर्च 106 कोटी 79 लाख 10 हजार 402 इतका दर्शवण्यात आला आहे तर अपेक्षित भांडवली खर्च 258 कोटी 33 लाख 91 हजार 667 इतका दर्शविण्यात आला आहे. सदरचा अर्थसंकल्प 3 लाख 9 हजार 480 रुपये महसुली व 91 लाख 84 हजार 576 रुपये भांडवली शिलकीचा आहे...पूढे वाचा...
यामध्ये जमा बाजूकडील महत्त्वाच्या बाबींमध्ये विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्यामार्फत वसूल होणारी शॉपिंग सेंटर थकीत वसुली असणारी 30 कोटी रुपयांची वसुली होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असणारी अमृत शहर 2.0 या योजनेतून नगरपरिषदेस 125 कोटी 10 लाख इतके अनुदान प्राप्त होणे अपेक्षित आहे.
मालमत्ता करावरील एकत्रित कर 10 कोटी 22 लाख 70 हजार 251 रुपये येणे अपेक्षित असून 30 कोटी शॉपिंग सेंटर विभागाकडील एकूण थकीत असलेले येणे अपेक्षित असून यामुळे एकूण मालमत्ता करापोटी 40 कोटी 22 लाख 70 हजार 251 रुपये असे एकूण जमा बाजूकडे दाखवण्यात आले आहेत. तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 22 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.पूढे वाचा...
खर्च बाजूकडील महत्त्वाच्या बाबींमध्ये डीपीडीसी अंतर्गत निधीतून कर्मचारी निवासस्थाने बांधण्यासाठी 15 कोटी खर्च अपेक्षित आहे. अमृत शहर 2.0 या योजनेतून नवीन पाण्याच्या टाक्या बांधणे, वितरण नलिका टाकणे, पाणीपुरवठ्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, पाण्यासाठी अत्याधुनिक मीटर बसविणे. याचबरोबर बांधकाम, ड्रेनेज विभागाकडील अनेक महत्त्वाची कामे अंतर्भूत करण्यात आलेली आहेत.
दिव्यांग बांधवांसाठी अंदाजपत्रकाच्या 5% प्रमाणे, महिला व बालविकाससाठी 5 टक्के, मागासवर्गीय व कल्याणकारी घटकांसाठी 5% याप्रमाणे प्रत्येक घटकासाठी प्रत्येकी 25 लाख प्रमाणे सन 2023-24 चे अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली असुन क्रीडाविकास व सैनिक कल्याणकारी योजना याचबरोबर शहरातील नागरिक, पर्यावरण व इतर सर्व घटकांचा विचार करून भरीव तरतूद या अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेली आहे.


Comments
Post a Comment