कराड नगरपरिषदेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन...
कराड नगरपरिषदेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन...
कराड दि.20 (प्रतिनिधी) कराड नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रांगोळी स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.
या स्पर्धांचा कालावधी 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे. माझी वसुंधरा माझी जबाबदारी हा चारही स्पर्धांचा विषय असणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी 11 ते 2 या वेळेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृति सदनात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत पाच बक्षीस देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार, तृतीय क्रमांक दोन हजार व उत्तेजनार्थ एक हजार रुपयांची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत...पूढे वाचा
स्पर्धेच्या नियम व अटी----1)स्पर्धकाचे वय किमान 14 वर्षे असावे, 2)एका स्पर्धकाला एकच रांगोळी काढता येईल (रांगोळीचा आकार चार फूट बाय तीन फूट असावा) 3) काढलेली रांगोळी ही दिलेल्या विषयावर अनुसरून असावी. 4) रांगोळी काढताना व पूर्ण झाल्यावर फोटो व व्हिडिओ काढून नगरपालिकेत जमा करावेत. 5) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. 6)नगरपालिकेत नाव वयाचा पुरावा व पत्त्याचा पुराव्या सहित नाव नोंदणी करावी. 7) सदरची स्पर्धा ही कराड शहरातील रहिवाशी नागरिकांच्या पुरती मर्यादित आहे. 8) आपल्या वक्तृत्वाचा व्हिडिओ हा आडवा शूट केलेला असावा. 9) सदर व्हिडिओमध्ये स्पर्धकांचा ओरिजनल आवाज असावा डबिंग केलेला आवाज ग्राह्य धरला नाही धरला जाणार नाही. संपूर्ण व्हिडिओ आपले नाव पत्ता मोबाईल नंबर इत्यादी माहिती पाठविणे 10) वक्तृत्व स्पर्धेचा व्हिडिओ जास्तीत जास्त चार मिनिटांचा असावा. 11) स्पर्धकांनी सर्व डाटा नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण विभागांमध्ये दिनांक 27 फेब्रुवारी रोजी स्वतः आणून द्यावयाचा आहे.
कलाकृती पाठवण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क 9175023738 9673964590 9209503336 7058612281



Comments
Post a Comment