कराडात बारावी परिक्षेस प्रारंभ; सावित्रीच्या लेकीची बाळासह परिक्षा....
कराडात बारावी परिक्षेस प्रारंभ; महिलेची 15 दिवसांच्या बाळासह परिक्षेला हजेरी...
कराड दि.21 (प्रतिनिधी) कोरोना संसर्ग काळानंतर प्रथमच शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेल्या इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेस आज प्रारंभ झाला. कराड शहरातील विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी अधिकची दहा मिनिटं वेळ वाढवून देण्यात आली आहे. महामार्गावरील उड्डाणपूल पाडण्याच्या कामामुळे वळवण्यात आलेल्या वाहतुकीचा फटका काही विद्यार्थ्यांना नकळत बसला. मात्र वाहतूक पोलिसांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी त्यांच्या वाहनांना वाट मोकळी करून दिल्याने विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले.शहरातील विविध परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. पूढे वाचा...
दरम्यान कराडच्या विटामाता विद्यालयातील परीक्षा केंद्रावर लक्ष वेधले ते एका परीक्षार्थी महिलेने. ही महिला आपल्या पंधरा दिवसांच्या बाळाला घेऊन परीक्षा देण्यासाठी केंद्रावर आल्याने अनेक जणांच्या नजरा या परीक्षार्थी महिलेकडे वळल्या होत्या. विटामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पवार व अन्य शिक्षिकांनी तिला व तिच्या बाळासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली. त्या परीक्षार्थी महिलेचे बाळ सांभाळण्यासाठी स्वतंत्र महिला व तिची व्यवस्था शाळेत करण्यात आली होती...पूढे वाचा..
सातारा जिल्ह्यात 51 परीक्षा केंद्रावर आज ही परीक्षा सुरू झाली. जिल्ह्यात या परीक्षेसाठी 36 हजार 87 विद्यार्थी बसले आहेत. कराड तालुक्यात 13 परीक्षा केंद्रावर आज इंग्रजीच्या पेपरने परीक्षेस प्रारंभ झाला.

Comments
Post a Comment