कराड नगरपरिषदचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना मातृशोक...

कराड नगरपरिषदचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना मातृशोक...

कराड दि.27- : कराड नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना आज 27 फेब्रुवारी रोजी सकाळी मातृशोक झाला. डाके यांच्या मातोश्री सौ.सुनिता दिलीप डाके (वय-  61) यांचे आज सकाळी सव्वासात वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पलूस या त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.

सौ सुनीता डाके यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे असा नेहमी प्रयत्न केला. त्यांनी पारंपरिक व्यवसायात पतीला सर्वतोपरी मदत केली आहे. स्वतःचे शिक्षण कमी असुन त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले आहे. त्यांचा मुलगा रमाकांत डाके मुख्याधिकारी असुन लहान मुलीने डी.एड शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच रमाकांत डाके हे प्रशासकीय सेवेत रुजू असून कराड नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. 

सौ. सुनिता दिलीप डाके यांच्यावर पलूस (ता. पलूस) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच सौ सुनीता डाके यांच्या पश्चात एक मुलगा व 2 मुली, नात, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन  1 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी पलूस येथील स्मशानभूमी होणार आहेत.



कराड टुडे आॅनलाईन न्यूज पोर्टल व कराड टुडे न्यूज चॅनेलसाठी बातम्या व जाहिरातींसाठी सपंर्क-राजू सनदी,कराड

9822308552,9823141970 rajusanadi@gmail.com

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक