मलकापूरात शेकडो झांडावर पडली कुर्हाड;परिसर होतोय भकास...
मलकापूरात शेकडो झांडावर पडली कुर्हाड;परिसर होतोय भकास...
कराड दि.22 (प्रतिनिधी) सहा पदरीकरणाअंतर्गत पेट नाका ते शेंद्रे सुरू असलेल्या कामात कराडच्या मलकापूर जवळ असणाऱ्या शेकडो झाडावर कुऱ्हाड पडली आहे. काल मलकापूर पासून पाचवड फाटा दरम्यान असणाऱ्या झाडांची तोडणी सुरू करण्यात आली आहे. मलकापूर येथे कोयना औद्योगिक वसाहत, डी मार्ट परिसरात दोन्ही बाजूला असणारी झाडे जमीनदोस्त झाल्याने संपूर्ण परिसर भकास दिसू लागला आहे. आजही हे काम सुरू असून दोन्ही बाजूची झाडे तोडली जात आहेत..पूढे वाचा...
येत्या काही दिवसात मलकापूर येथील भरावाचा पूल पाडण्यात येणार असल्याने सातारा व कोल्हापूर या दोन्ही बाजूकडे जाणारे सर्विस रोड वरील कामे सुरू करण्यात आले आहेत. या पुलाच्या पाडकामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक वळवण्यात येणार आहे. त्यामुळे सेवा रस्त्यांची दुरुस्ती तसेच रुंदीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. पंकज हॉटेल ते नांदलापूर हद्दीतील लोटस फर्निचर यादरम्यान साडेतीन किलोमीटरचा नवीन उड्डाणपूल होणार असल्याने या साडेतीन किलोमीटर परिसरातील कामकाजाला सध्या गती आली आहे...पूढे वाचा...
गेले दोन दिवस झाले मलकापूर परिसरात महामार्गाच्या दोन्ही बाजूस असणारी झाडे तोडण्याचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात यंत्रणा व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय डीपी जैन कंपनीचे अधिकारीही या कामावर लक्ष ठेवून आहेत. झाडे तोडण्याच्या कामाचा वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे.


Comments
Post a Comment