जयवंत शुगर्सचा 5 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण...
जयवंत शुगर्सचा 5 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण...
कराड दि.20- : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने या गळीत हंगामात यशस्वीपणे घोडदौड सुरू ठेवली असून, कारखान्याने ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला आहे. तसेच ३१ जानेवारीपर्यंतचे ऊसबिल वर्ग करून, ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे...पूढे वाचा..
जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. यंदाचा गळीत हंगाम १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरू झाला. कारखान्याने आजअखेर ९८ दिवसात ५ लाख ४ हजार ७५ मे. टन ऊसाचे गाळप केले असून, ५ लाख ५० हजार ३०० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा १२.३५ टक्के इतका राहिला असून, को-जनरेशन प्रकल्पातून आजअखेर २ कोटी ६५ लाख ५३ हजार १० युनिट इतक्या विजेची निर्मिती कारखान्याने केली आहे...पूढे वाचा..
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जयवंत शुगर्सने ३१ जानेवारी अखेरपर्यंतचे ऊस बिल प्रतिटन २९५१ रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. त्याचबरोबर ऊस तोडणी वाहतुकीचे बिलही संबंधिताना अदा करण्यात आले आहे. जयवंत शुगर्सच्या या कामगिरीबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.



Comments
Post a Comment