कोल्हापूरच्या सिध्दगिरी कणेरी मठातील गो-शाळेतील अनेक गायींचा मृत्यू...
कोल्हापूरच्या कणेरी मठातील गो-शाळेतील अनेक गायींचा मृत्यू...
कोल्हापूर दि.24-कोल्हापूर जिल्ह्यातील सिध्दगिरी कणेरी मठात (Siddhagiri Sansthan Kaneri Math) शिळे अन्न खायला घातल्याने 50 हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गेल्या चार दिवसांपासून या मठात सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव (Sumangalam Panchamahabhuta Lokotsav ) सुरू आहे. या दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मठात असलेल्या गो-शाळेतील गायींना शिळे अन्न खायला घातल्याने तब्बल 50 हून अधिक गायी दगावल्या असल्याची चर्चा सूरू असुन 30 गायी कोमात आहेत. या मठात हजारो देशी गायींची गोशाळा आहे.
दरम्यान आज या कनेरी मठात सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तसेच उद्या केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तर कर्नाटक विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह अध्यक्ष बसवराज होरत्ती हेही या कार्यक्रमासाठी येणार आहेत.पूढे वाचा...
कोल्हापूर नजीकच्या कणेरी मठात अचानक घडलेल्या या प्रकाराने कणेरी मठावर खळबळ उडाली आहे.काल सायंकाळपासुन हा प्रकार उघडकीस आला आहे. कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा सुरू असतानाच ही घटना घडली असुन 30 गायी गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र मठातून अधिकृतरित्या याबाबत कोणतेही माहिती देण्यात आलेली नाही.त्यामूळे संभ्रम वाढला आहे.पूढे वाचा...
मठातील कार्यक्रमासाठी दररोज हाजारो लोक येत आहेत.त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येते. या जेवणातील काही शिल्लक शिळे अन्न गायींना खाऊ घातल्याने मृत्यू झाल्याची इथे चर्चा आहे. गंभीर गाईंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मठावर देशी गाईंची मोठी गोशाळा आहे. गोशाळेत हजारो गायी आहेत. मठ प्रशासनाकडून घडलेल्या घटनेबाबत लपवाछपवी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप होत आहेत.


Comments
Post a Comment