जयवंत शुगर्सच्या वजनकाट्यावर शासनाकडून विश्वासार्हतेची मोहोर...

 

धावरवाडी : जयवंत शुगर्सच्या वजनकाट्याची पाहणी करताना शासकीय व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी...

जयवंत शुगर्सच्या वजनकाट्यावर शासनाकडून विश्वासार्हतेची मोहोर...

कराड दि.22- धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स कारखाना कार्यस्थळाला शासकीय प्रतिनिधी व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त समितीने भेट देऊन वजनकाट्याची पाहणी केली. यावेळी समितीच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी, प्रत्येकवेळी अचूक वजन नोंदविण्यात आल्याने जयवंत शुगर्सचा वजनकाटा हा अचूक आणि विश्वासार्ह असल्याचे प्रशस्तिपत्र शासनाच्या समितीकडून देण्यात आले. त्यामुळे जयवंत शुगर्सच्या वजनकाट्याला शासनाकडून विश्वासार्हतेची मोहोर प्राप्त झाली आहे..पूढे वाचा...

सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची पाहणी प्रशासनाकडून केली जात आहे. यानुसार वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, वैद्यमापन निरीक्षक योगेश अग्रवाल, लेखा परीक्षक लक्ष्मण माने, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष अशोक लोहार आदींनी संयुक्तपणे कारखाना कार्यस्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या प्रमाणित वजनाने तपासणी करण्यात आली. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे निदर्शनास आल्याने, जयवंत शुगर्सचा वजनकाटा निर्दोष व अचूक असल्याचा शेरा समितीने दिला..पूढे वाचा...

यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी रामचंद्र पाटील, केनयार्ड सुपरवायझर अच्युत गोरे, सतीश सोमदे, क्रेन मॅनेजर एन. जी. कदम, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर अरुण खटके, कार्यालयीन अधीक्षक आर. टी. शिरसाट, अण्णा इंदलकर यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक