सरस्वती शिशुवाटिकेचे नवोपक्रम स्पर्धेत सलग दुसर्या वर्षी घवघवीत यश.....
कराड दि.23 (प्रतिनिधी) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे (SCERT) आयोजित राजस्तरिय नवोपक्रम स्पर्धा 2022-23 स्पर्धा झाली. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती शैक्षणिक संकुलातील 2 शिक्षिकांनी घवघवीत यश संपादन केले आहे.सलग दूसर्या वर्षी मिळालेल्या या यशामूळे शाळेचे नाव उंचावले आहे.विजेत्या शिक्षिका सौ.तृप्ती गोखले व सौ.भाग्यश्री कोळेकर यांचे संस्थेचेवतीने अभिनंदन करण्यात आले आहे...पूढे वाचा...
शिक्षकांकडून राबवण्यात येणाऱ्या नवनवीन उपक्रमांची माहिती इतर शिक्षकांनाही मिळावी, या उद्देशाने नवोपक्रम स्पर्धा घेण्यात येते. यापूर्वी जिल्हास्तरीय स्पर्धेत ही सरस्वती शैक्षणिक संकुलातील 5 शिक्षिका विजेत्या ठरल्या होत्या. यावर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत ही 2 शिक्षिका विजेत्या ठरल्याने सर्वत्र शाळेचे कौतुक केले जात आहे....पूढे वाचा...
या स्पर्धेमध्ये पूर्व प्राथमिक गटात सौ.तृप्ती उमेश गोखले (चतुर्थ क्रमांक), सौ.भाग्यश्री महेश कोळेकर (उत्तेजनार्थ क्रमांक) या दोन शिक्षिकांनी यश संपादन केले असुन जनकल्याण संस्था, सरस्वती विद्यालयाच्यावतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे.तसेच शिशुवाटिकेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका, शिक्षक यांनी ही सौ.गोखले व सौ.कोळेकर यांचा सत्कार करुन अभिनंदन केले आहे.




Comments
Post a Comment