नागझरी येथील आश्रमशाळा डिजिटल करणार - सारंग पाटील...
नागझरी येथील आश्रमशाळा डिजिटल करणार - सारंग पाटील...
कराड दि.26-ग्रामीण भागातील गरिब, होतकरु विद्यार्थ्यांना तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थांच्या दर्जेदार शिक्षणासाठी मदत करण्याची इंद्रधनु फाउंडेशन या सामाजिक संघटनेची भूमिका दिशादर्शक आहे. नागझरी ता.कोरेगाव येथील संत रोहिदास आश्रमशाळा डिजिटल करण्यासाठी श्रीनिवास पाटील सोशल फाउंडेशन पुढाकार घेइल असा विश्वास राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केला..पूढे वाचा...
माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने इंद्रधनु फाउंडेशन, कराडच्या वतीने नागझरी ता.कोरेगांव येथील संत रोहिदास आश्रमशाळेतील ८३ विद्यार्थी विद्यार्थीनींना शालेय साहित्य , क्रीडा साहित्याचे वाटप सारंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंद्रधनु फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदिप चेणगे, माणिक डोंगरे, अशोक मोहने, प्रमोद तोडकर, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले, माजी सरपंच आर.आर.फडतरे, सामाजिक कार्यकर्ते विकास थोरात, बाळासाहेब भोसले, सरपंच वैशाली धनाजी यादव, उपसरपंच विश्वास भोसले, पोलीस पाटील रुपाली भोसले, विलास भोसले, भागवत भोसले, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव भॊसले, नामदेव गुरव, माजी उपसरपंच अजित भोसले, पांडुरंग मुळीक, आश्रमशाळा प्रभारी मुख्याध्यापक भीमराव येवले, अधिक्षक बाबुराव घाडगे, सहशिक्षिका विमल भोसले, रोहित फडतरे यांची उपस्थिती होती.



Comments
Post a Comment