Posts

Showing posts from April, 2022

राज्यात 155 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली; 135 जण कोरोनामुक्त झाले.....

Image
जिल्ह्यात आज 1 बाधिताची वाढ .... कराड दि.30 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात एका कोरोना बाधिताची नोंद झाली . जिल्ह्यात काल  157  जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ एक रुग्ण आहे. सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44616), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27929), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5365), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 1 (60267), वाई-0 (17542), इतर-0 (3159) असे 1 व आजपर्यंत 2 लाख 79 हजार 229 बाधितांची संख्या झाली आहे. एकूण चाचण्या-25 लाख 77 हजार 932 एकूण बाधित-2 लाख 79 हजार 231  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 854 एकूण मृत्यू-6 हजार 683 सध्या उपचारार्थ रुग्ण-0 राज्यात 155 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 155 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून सध्या राज्यात 998 उपचारार्थ रुग्ण आहेत तर गेल्या चोवीस तासात 135 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मुंबईत 609, पुण्यात 223,  ठाण्यात 85 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. राज्यात आज 1 क...

जयवंत शुगर्सच्या ११ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता...

Image
धावरवाडी : जयवंत शुगर्सच्या ११ व्या गळीत हंगाम सांगता सोहळ्याप्रसंगी डॉ. अतुलबाबा भोसले आणि श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते सर्वाधिक ऊसवाहतूक करणार्‍या तोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर यांच्यासह अधिकारी व तोडणी वाहतूकदार.... जयवंत शुगर्सच्या ११ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता... १९० दिवसांत ७,६६,००० मेट्रीक टन ऊसगाळप; ८,२८,००० क्विंटल साखरेचे उत्पादन... कराड, दि. 3 : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स लिमिटेडच्या ११ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले आणि श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते ऊसतोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला. धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकूण १९० दिवसांच्या गळीत हंगामात ७ लाख ६६ हजार मेट्रीक टन ऊस गाळप केले असून, ८ लाख २८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर सरासरी साखर उतारा १२.४० टक्के इतका राहिलेला आहे. याचबरोबर जयवंत शुगर्सचा डिस्टलरी प्रकल्प...

महाराष्ट्रात आज 148 कोरोना बाधित रुग्णांची वाढ तर 128 जण झाले कोरोनामुक्त....

Image
  जिल्ह्यात आज ही  बाधिताची वाढ नाही... कराड दि.29 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात 6 व्या दिवशी ही एका ही कोरोना बाधिताची नोंद झाली नाही. जिल्ह्यात काल 160 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ एक ही रुग्ण नाही. एकूण चाचण्या-25 लाख 77 हजार 775 एकूण बाधित-2 लाख 79 हजार 230  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 854 एकूण मृत्यू-6 हजार 683 सध्या उपचारार्थ रुग्ण-0 राज्यात 148 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 148 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून सध्या राज्यात 979 उपचारार्थ रुग्ण आहेत तर गेल्या चोवीस तासात 128 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मुंबईत 587, पुण्यात 216,  ठाण्यात 92 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. राज्यात आज 2 करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारतात गेल्या 24 तासात 3 हजार 377 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून  2496  जण कोरोनामुक्त झाले आहेत.  सध्या देशात 17 हजार 801 रुग्ण ॲक्टिव आहेत.  आज  60  करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.

जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी विशेष मोहिम- पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल....

Image
जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी विशेष मोहिम- पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल.... सातारा,दि.29 : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस विभाग व इतर विभागांच्या समन्वयातून 1 मे ते 31 मे 2022 या कालावधीत जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक पोलीस मुख्यालयात घेण्यात आली. यावेळी श्री. बंसल बोलत होते. या बैठकीला केंद्रीय वस्तु व सेवा कर विभागाचे अधीक्षक महेश व्हटकर, औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनिषा जवंजाळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्रीकांत खरात, वैद्यकीय अधिकारी उत्कर्षा साळुंखे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते. पार्सल सुविधेतून अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही याबाबत लक्ष ठेवण्यात यावे. व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये व्यसनमुक्तीसाठी दाखल झालेल्या व्यक्तिंची संख्या व त्यांना कोणत्या अंमली पदार्थांचे व्यसन आ...

कराडमध्ये महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी ‘वॉकेथॉन’; ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’तर्फे आयोजन...

Image
  कराडमध्ये महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी ‘वॉकेथॉन’... . ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’तर्फे आयोजन; डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती.... कराड, 29 : नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’च्या कराड शाखेच्यावतीने रविवारी (ता. १) महाराष्ट्र दिनानिमित्त प्रीतिसंगम घाटावर सकाळी ६ वाजता ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात भूलतज्ज्ञांचे असलेले महत्व अधोरेखित व्हावे, तसेच उत्तम आरोग्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी या ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. 'प्रत्येक नागरिक एक जीवन रक्षक' या उपक्रमाअंतर्गत अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत करावयाचे Compression only life support (COLS) म्हणजेच जीवनसंजीवनी क्रिया याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक यावेळी दिले जाणार आहे. या वॉकेथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’च्या कराड शाखेचे अध्यक्ष डॉ....

राज्यात 165 कोरोना बाधित रुग्णांची वाढ; 157 जण झाले कोरोनामुक्त......

Image
  जिल्ह्यात आज ही  बाधिताची वाढ नाही... कराड दि.28 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात 5 व्या दिवशी ही एका ही बाधिताची नोंद झाली नाही. जिल्ह्यात काल 113 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ एक ही रुग्ण नाही. एकूण चाचण्या-25 लाख 77 हजार 544 एकूण बाधित-2 लाख 79 हजार 230  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 854 एकूण मृत्यू-6 हजार 683 सध्या उपचारार्थ रुग्ण-0 राज्यात 165 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 165 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून सध्या राज्यात 961 उपचारार्थ रुग्ण आहेत तर गेल्या चोवीस तासात 157 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मुंबईत 90, पुण्यात 34,  ठाण्यात 21 रुग्णांची वाढ झाली.राज्यात आज 2 करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेलीआहे. भारतात गेल्या 24 तासात 3 हजार 303 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून  सध्या देशात 16 हजार 980 रुग्ण ॲक्टिव आहेत. राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत #कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायच...

राज्यात 186 कोरोना बाधित रुग्णांची वाढ; 174 जण कोरोनामुक्त.....

Image
  जिल्ह्यात आज ही  बाधिताची वाढ नाही... कराड दि.27 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी एका ही बाधिताची नोंद झाली नाही. जिल्ह्यात काल 187 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ एका ही रुग्ण नाही. सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44616), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27929), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5365), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 0 (60266), वाई-0 (17542), इतर-0 (3159) असे 0 व आजपर्यंत 2 लाख 79 हजार 230 बाधितांची संख्या झाली आहे. एकूण चाचण्या-25 लाख 77 हजार 431 एकूण बाधित-2 लाख 79 हजार 230  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 854 एकूण मृत्यू-6 हजार 683 सध्या उपचारार्थ रुग्ण-0 राज्यात 186 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 186 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून सध्या राज्यात 955 उपचारार्थ रुग्ण आहेत तर गेल्या चोवीस तासात 174 जण कोरोनामुक्त झाले आहेत.मुंबईत 563, पुण्यात 219,  ठाण्यात 76...

कराडात प्रीतीसंगमामध्ये बुडून मूलाचा मृत्यू; घाटावरील व्यावसाय बंद ठेवून श्रध्दांजली...

Image
कराडात प्रीतीसंगमामध्ये बुडून मूलाचा मृत्यू; घाटावरील व्यावसाय बंद ठेवून श्रध्दांजली... कराड दि.27-(प्रतिनिधी) येथिल कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमात आज एका मूलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कैलास उकाराम कूंभार-प्रजापती (वय 17) असे या मूलाचे नाव आहे. हा मूलगा आपल्या कुटूंबासह आज रात्री मूळगावी राजस्थानला जाणार होता. त्याच्या मृत्यूनंतर कृष्णा घाटावरील सर्व हातगाडा व्यावसायिकांनी आपली दूकाने बंद ठेवून श्रध्दांजली वाहिली. आज सकाळी कैलास हा प्रीतीसंगमावर आंघोळीसाठी गेला होता.मात्र त्याला पोहण्यास येत नसल्याचे तेथिल नागरिकांनी सांगितले. कैलास नदीपात्रात गेल्यानंतर तो गाळात अडकल्याचे एका लहान मुलीने तेथे आंघोळीसाठी आलेल्या नागरिकांना सांगितले. यावेळी अनेकांनी पात्रात उड्या घेत कैलासला बाहेर काढून काॅटेज हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र कैलासचा मृत्यू झाला. कैलास याचे वडील उकाराम हे गेली अनेक वर्षे कराडात राहतात. त्यांचा घाटावर वडापाव, भेळचा गाडा संपूर्ण कूटूंब चालवत होते.राजस्थानला घरगूती कार्यक्रमासाठी कूंभार कूटूंब आज रात्री जाणार होते. र्दूदैवाने कैलासचा मृतदेह अंत्यसंस्क...

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण मधील ग्रामपंचायतीसाठी पाऊन कोटींचा निधी...

Image
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण मधील ग्रामपंचायतीसाठी पाऊन कोटींचा निधी... कराड दि.27- कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोटे, येणके, धोंडेवाडी, तुळसण व म्हासोली या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम हे ३५ ते ४० वर्षांपूर्वी झालेले असून इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. जुन्या इमारतीमध्ये जागा अत्यंत तोकडी असून रोजचे कार्यालयीन काम करणे त्रासदायक ठरत आहे. यामुळे मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेअंतर्गत निधी मंजूर व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या  ग्रामविकास मंत्र्यांकडे निधीची मागणी केली होती त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाख रुपये असा एकूण ७५ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.  गावातील ग्रामस्थांचे दैनंदिन कामासाठी ग्रामपंचायतीत येणे जाणे असते, यासाठी ग्रामपंचायतीच्या इमारती सुस्थितीत असणे आवश्यक असते. आ. पृथ्वीराज चव्हाण मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान गावागावांना भेटी देत असतात. यावेळी ग्रामस्थांच्या सोबत चर्चा करताना घेतलेल्या माहितीनुसार व प्रत्यक्ष ...

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा कोयना जलाशयात नौकाविहार.....

Image
  गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची केली पाहणी... सातारा दि. 26 : कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केली.  या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, प्रांतधिकारी सुनिल गाडे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे आदी उपस्थित होते. या पाहणी प्रसंगी श्री. देसाई म्हणाले, कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौकाविहार सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय  यांच्यासोबत  बैठका झालेल्या आहेत. कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौकाविहार सुरु झाल्यास स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे. कोयना जलाशयात नौकाविहार सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून पर्यटक व धरणाची सुरक्षितता पाहुनच योग्य तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत लवकरच पाठविण्यात येईल.  कोयनानगर पर्यटन विकासाचा सुधारित आराखडा लवकर तयार करा;गृह  राज्यमंत्री  शंभूराज देसाई... कोयनानगर परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे  मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थ...

राज्यात 153 कोरोना बाधित रुग्णांची वाढ; 135 जण कोरोनामुक्त तर 4 रुग्णांचा मृत्यू....

Image
  जिल्ह्यात आज ही एका ही बाधिताची वाढ नाही... कराड दि.26 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी एका ही बाधिताची नोंद झाली नाही तर आज 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले.जिल्ह्यात काल 137 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ एका ही रुग्ण नाही. सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44616), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27929), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5365), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 0 (60266), वाई-0 (17542), इतर-0 (3159) असे 0 व आजपर्यंत 2 लाख 79 हजार 230 बाधितांची संख्या झाली आहे. एकूण चाचण्या-25 लाख 77 हजार 244 एकूण बाधित-2 लाख 79 हजार 230  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 854 एकूण मृत्यू-6 हजार 683 सध्या उपचारार्थ रुग्ण-0 राज्यात 153 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 153 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून सध्या राज्यात 943 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर गेल्या चोवीस तासात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे व 135 जण कोरोना...

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड.....

Image
व्ही.एस.आय.च्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ना. बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करताना संचालक सुरेशराव माने, सौ.लक्ष्मी गायकवाड, मानसिंगराव जगदाळे, जशराज पाटील (बाबा) आदी... पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची व्ही.एस.आय च्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड;सह्याद्रि'च्या वतीने अभिनंदन ... कराड दि.26-महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. पुणे या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे, त्याबद्दल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे संचालक सुरेशराव माने (रा.चरेगाव) यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन ना.बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे कामकाज सुरू असून, राज्यातील साखर उद्योगाला या संस्थेकडून मार्गदर्शन केले जाते, त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकरी व सहकारी साखर कारखाने यांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या या संस्थेच्य...

राज्यात 84 नवीन कोरोना बाधितांची रुग्णांची वाढ झाली, तर 71 रुग्ण कोरोनामुक्त झाले....

Image
जिल्ह्यात आज ही एका ही बाधिताची वाढ नाही... कराड दि.25 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात एका ही बाधिताची वाढ झाली नाही तर आज एक ही रुग्ण कोरोनामुक्त झाला नाही.जिल्ह्यात काल 46 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ 2 रुग्ण आहे. सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44616), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27929), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5365), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 0 (60266), वाई-0 (17542), इतर-0 (3159) असे 0 व आजपर्यंत 2 लाख 79 हजार 230 बाधितांची संख्या झाली आहे. एकूण चाचण्या-25 लाख 77 हजार 107 एकूण बाधित-2 लाख 79 हजार 230  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 852 एकूण मृत्यू-6 हजार 683 सध्या उपचारार्थ रुग्ण-2 राज्यात 84 नवीन कोरोना बाधितांची रुग्णांची वाढ झाली, तर 71 रुग्ण कोरोनामुक्त झाले.... राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये घट झाली असली तरी देशातील कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,593 नवीन कोरोना रुग्...

मंत्रालयासह राज ठाकरे व संजय राऊत यांच्या घरासमोर शेतकरी आक्रोश भोंगे वाजवणार....

Image
अन्यथा मुंबईत शेतकर्‍यांचे आक्रोश भोंंगे ऐकण्यास तयार राहा..., कराड, दि. 25 (प्रतिनिधी) -सध्या राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या वाचाळ नेत्यांचे एकमेकां विरोधात दररोज भोंगे वाजत आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत भांडत असल्याने राज्यात पॉलिटिकल गँगवॉर सूरू असल्याची स्थिती निर्माण झाली असुन अशा परिस्थितीत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे हे राजकीय भोंगे बंद करा, अन्यथा 2 मे नंतरत मुंबईत शेतकर्‍यांचे आक्रोश भोंंगे ऐकण्यास तयार राहा, असा इशारा ज्येष्ठ शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी दिला आहे. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी,शेतकरी उपस्थित होते. पाटील म्हणाले, सत्ताधारी व विरोध पक्ष एकमेकांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करुन भांडत आहेत. त्यामुळे राज्यात पॉलिटीकल गँगवार चालू आहे असे वाटते. पुन्हा सत्तेत येण्यासाठी विरोधी पक्ष बेचैन आहे. राज्याचे सर्वच मंत्री अभि नही... तो कभी नही... हे धोरण अवलंबु...

कराडात स्वरनिर्झरच्या संगीत मैफीलीने रसिक-श्रोते मंत्रमुग्ध....

Image
  स्वरनिर्झरच्या संगीत मैफीलीने रसिक-श्रोते मंत्रमुग्ध.... कराड दि.25-स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित संगीत मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध झाले. अर्बन बॅन्क मुख्यालय शताब्दी सभागृह कराड येथे मैफीलीची सुरुवात खा.श्रीनिवास पाटील, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अर्बन बॅंकेचे चेअरमन सुभाषरव एरम, व्हाईस चेअरमन समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, उद्योगपती सागर जोशी व स्वरनिर्झर अकादमीच्या अध्यक्षा सौ. आलापिनी जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.  मैफीलत सौ. आलापिनी जोशी यांनी कमी गायला जाणारा अनवट ‘राग ललितागौरी’ ने सादरीकरणाची सुरुवात केली. मींड, खेंच, लहक अशा अंगांचा वापर करत त्यांनी ‘प्रीतम सैय्या’ या विलम्बित त्रितालातील ख्यालाची बढत केली. लय अंगाने घेतलेल्या बोलांनी गायनाची रंजकता वाढली. नंतर त्रितालातील ‘मोरा मन हर लिनो’ हा पारंपारिक छोटा ख्याल तानांचे तुकडे, बोलताना, इ.द्वारे खुलवला. संत कान्होपात्रा नाटकातील ‘पतित तू पावना’ या नाट्यगीताने त्यांनी सादरीकरणाची सांगता केली. त्यांना योगेश रामदास यांनी संवादिनीसाथ तर चैतन्य देशपांडे यांनी त...

देशातील कोरोनाचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासांत 2,593 नवे कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू...

Image
  जिल्ह्यात एका ही बाधिताची वाढ नाही... कराड दि.24 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात एका ही बाधिताची वाढ झाली नाही तर आज एक ही रुग्ण कोरोनामुक्त झाला नाही.जिल्ह्यात काल 171 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ 2 रुग्ण आहे. सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44616), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27929), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5365), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 0 (60266), वाई-0 (17542), इतर-0 (3159) असे 0 व आजपर्यंत 2 लाख 79 हजार 230 बाधितांची संख्या झाली आहे. एकूण चाचण्या-25 लाख 77 हजार 61 एकूण बाधित-2 लाख 79 हजार 230  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 852 एकूण मृत्यू-6 हजार 683 सध्या उपचारार्थ रुग्ण-2 देशातील कोरोनाचा आलेख वाढतोय, गेल्या 24 तासांत 2 हजार 593 नवे कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू... देशातील कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,593 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा ...

कराडातील तरूणाने घेतला संन्यास; दिक्षापूर्व मिरवणूकीत समाज बांधवांचा मोठा सहभाग...

Image
कराडातील तरूणाने घेतला संन्यास; दिक्षापूर्व मिरवणूकीत समाज बांधवांचा मोठा सहभाग... कराड दि.24 (प्रतिनिधी) शहरातील व्यावसायिक अनिल घेवरचंद मुथा यांचा तरुण मुलगा रजकुमार (वय 23) हा दीक्षा घेणार असल्याने त्याची आज शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात जैन बांधव सहभागी झाले होते. सुपर मार्केट येथील जैन मंदिरापासून या मिरवणुकीला प्रारंभ झाला.मिरवणूकीत रजतकूमार आपल्या माता-पित्यासह सहभागी झाला होता. रजकुमार हा पुढील महिन्यात गुजरात मधील शंकेश्वर येथे दीक्षा घेणार आहे. जैन धर्मियांमध्ये लहानापासून वृध्दापर्यंत अनेक जण संन्यास घेतात.मोह माया याचा त्याग करून संन्यासी जीवन जगण्यासाठी स्वताला अनेक जण समर्पित करतात. दिक्षा घेतल्या नंतर साधू बनून धर्म व साधना यामध्ये जीवन जगावं लागतं.चार महिन्यापूर्वी कराडातील यूवा पती-पत्नी यांनी ही संन्यास घेतला आहे.त्यानंतर आता रजतकूमार हा संन्यास घेणार असल्याने त्यापूर्वी आज शहरातुन मिरवणूक काढण्यात आली.बॅंन्ड बाजा,भवानी तांडव झांज पथक, भटिंडा येथिल गूरूगोविंद बॅन्ड, केरळ वाद्य पथकाच्या वाद्यात शहरातील जैन समाज या मिरवणूकीत सहभागी झाला...

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन;वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात टिपला पट्टेरी वाघ....

Image
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन; वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात टिपला पट्टेरी वाघ.... कोल्हापूर, दि.23: वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात आज पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पालकमंत्री सतेज पाटील यांनी वन्यजीव निरीक्षण करिता ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून 100 ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यात आले होते. हा ट्रॅप कॅमेरा राधानगरी दाजीपूर जंगलामध्ये लावण्यात आला असून पंचवीस दिवस वन्य जीवन निरीक्षणाची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन जंगलात मोक्याच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. आज दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी लावलेल्या ट्रॅप कॅमेरा मध्ये पुर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ छायाचित्रीत झाला आहे.यापूर्वी 2019 मध्ये एकदा वाघाचे छायाचित्रण झाले होते. परंतु त्यानंतर वाघाचे छायाचित्रण झाले नाही. वनाचे संरक्षण, कुरण विकास, प्रशिक्षित आणि सतर्क वन कर्मचारी, वणव्याचे घटलेले प्रमाण या सर्व बाबींमुळे राधानगरीचा अधिवास वाघासाठी पूरक झाल्याचे दिसू...

देशात आज 2 हजार 527 नवीन कोरोना बाधितांची वाढ;33 रुग्णांचा मृत्यू....

Image
  जिल्ह्यात एका बाधिताची वाढ... कराड दि.23 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात एका बाधिताची वाढ झाली असून आज एक ही रुग्ण कोरोनामुक्त झाला नाही.जिल्ह्यात काल 200 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ 2 रुग्ण आहे. सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44616), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27929), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5365), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 0 (60266), वाई-1 (17542), इतर-0 (3159) असे 1 व आजपर्यंत 2 लाख 79 हजार 230 बाधितांची संख्या झाली आहे. एकूण चाचण्या-25 लाख 76 हजार 890 एकूण बाधित-2 लाख 79 हजार 230  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 852 एकूण मृत्यू-6 हजार 683 सध्या उपचारार्थ रुग्ण-2 राज्यात 194 बाधितांची वाढ.... राज्यात आज 194 कोरोना बाधितांची वाढ झाली असून, एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे, तर 141 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 869 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 503 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  गेल्या 24 तासांत दे...

कृष्णा अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय हृदयरोगशास्त्र परिषद उत्साहात...

Image
कराड : कृष्णा अभिमत विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय हृदयरोगशास्त्र परिषदेत बोलताना कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस डॉ. प्रवीण शिणगारे, डॉ. सी. नरसिंम्हन, डॉ. बी. के. शास्त्री, डॉ. एम. व्ही. घोरपडे, डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. आर. जी. नानिवडेकर व डॉ. सोमनाथ साबळे.... कृष्णा अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय हृदयरोगशास्त्र परिषद उत्साहात... देशभरातील नामवंत हृदयरोग तज्ज्ञांचा सहभाग; अत्याधुनिक उपचार प्रणालीवर चर्चा.... कराड, दि. 23: हृदयरोगावरील उपचारांचे बदलते तंत्रज्ञान आणि नवी आव्हाने या विषयांवर सर्वंकष चर्चा करण्यासाठी कराड येथे कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हृदयरोगशास्त्र परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत देशभरातील नामवंत हृदयरोग तज्ज्ञांनी सहभाग घेतला. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर कृष्णा विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, सुप्रसिद्ध कार्डियाक इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट डॉ. सी. नरसिंम्हन, वरिष्ठ इंटरव्हेंशन कार्डिओलॉजिस्ट डॉ. बी. के. शास्त्री, ...

लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी; पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Image
  लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन... सातारा दि. 23: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर ता. पाटण येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी रविराज देसाई, यशराज देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गृह राज्यमंत्री श्री. देसाई व मान्यवरांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन केल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस बॅन्डपथकाने राष्ट्रीय गीत वाजवून मानवंदना दिली.

राज्यात आज 121 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर एक ही मृत्यूची नोंद नाही......

Image
जिल्ह्यात एका बाधिताची वाढ... कराड दि.22 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात एका बाधिताची वाढ झाली असून आज दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात काल 184 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ 1 रुग्ण आहे. सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44616), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27929), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5365), पाटण-1 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 0 (60266), वाई-0 (17541), इतर-0 (3159) असे 1 व आजपर्यंत 2 लाख 79 हजार 229 बाधितांची संख्या झाली आहे. एकूण चाचण्या-25 लाख 76 हजार 690 एकूण बाधित-2 लाख 79 हजार 229  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 852 एकूण मृत्यू-6 हजार 683 सध्या उपचारार्थ रुग्ण-1 राज्यात शुक्रवारी 121 कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यूची नोंद... राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार  होताना  दिसत आहे.  शुक्रवारी राज्यात  121 रुग्णांचे निदान झाले आहे.  राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील  एक हजारांखाली आली आहे. र...

अमोल मिटकरींचे आक्षेपार्ह वक्तव्याचा कराडात निषेध; ब्राम्हण समाजाच्यावतीने पोलिसात निवेदन...

Image
  अमोल मिटकरींचे आक्षेपार्ह वक्तव्याचा कराडात निषेध; ब्राम्हण समाजाच्यावतीने पोलिसात निवेदन... कराड दि.22 (प्रतिनिधी) अमोल मिटकरी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्था व कराड मधील सर्व ब्राह्मण संघटना यांनी एकत्र येऊन मिटकरी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व त्यांच्या गून्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसात निवेदनाद्वारे केली आली आहे.याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना देण्यात आले आहे. यावेळी सर्व ब्राह्मण संघटना व त्यांचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष जयंत बेडेकर, सचिव ओंकार आपटे, कोषाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, संचालक अरुण प्रभुणे, उपाध्यक्ष विकास देशपांडे, सौ विनिता पेंढारकर, मल्हारी उमराणी, माधव गिजरे, संदीप भागवत , शरद हरदास, श्रीकांत ढवळे, राजाभाऊ जाखलेकर आदी समाजबांधव उपस्थित होते. या निवेदनावर समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्था कराड, चित्तपावन ब्राह्मण संघ कराड, बहुभाषिक ब्राह्मण संघ, आगशिवनगर, बहुभाषिक ब्राह्मण संघ, विद्यानगर, ब्राह्मण बहुउद्देशीय चॅरिटेबल फौंडेशन श्र्संहिता स्वाह...

खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून नळ योजनेसाठी 35 गावांना 26 कोटी 63 लक्ष निधी

Image
  नळ योजनेसाठी 35 गावांना 26 कोटी 63 लक्ष निधी.... खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी मंजूर... . कराड दि.22 (प्रतिनिधी) खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन अंतर्गत सातारा लोकसभा मतदार संघातील 35 गावातील अस्तीत्वातील नळ पाणी पुरवठा योजनांना सुधारणात्मक पुर्नजोडणी करणे कामांसाठी  26 कोटी 63 लक्ष 75 हजाराचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. खा.पाटील यांच्या प्रयत्नातून सदर गावांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याने येथील नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती मिळणार आहे. कराड तालुक्यातील कोणेगाव येथे अस्तीत्वातील नळ पाणीपुरवठा योजनेचे सुधारणात्मक पुर्नजोडणी करणे कामासाठी 23 लक्ष 87 हजार, म्हासोली येथे अस्ती. न.पा.पु.योजनेचे सुधारणात्मक पुर्नजोडणी करणे 1 कोटी 88 हजार नवीन कवठे येथे योजनेसाठी 60 लक्ष 22 हजार, यणपे-शेवाळवाडी (चोरमारवाडी) येथे योजनेसाठी 67 लक्ष 68 हजार, अंधारवाडी येथे योजनेसाठी 10 कोटी, चिंचणी येथे योजनेसाठी 20 लक्ष 16 हजार, तासवडे येथे योजनेसाठी 60 लक्ष 68 हजार, कोळेवाडी येथे योजनेसाठी 24 लक्ष 88 हजार, कळंत्रेवाडी येथे योजनेसाठी 59 लक्ष 21 हजार,...